Traders refuse to buy lemons in Shrigonda; The trade market committee's argument came to an end | श्रीगोंद्यात लिंबू खरेदीस व्यापा-यास नकार; व्यापारी-बाजार समितीचा वाद टोकाला

श्रीगोंद्यात लिंबू खरेदीस व्यापा-यास नकार; व्यापारी-बाजार समितीचा वाद टोकाला

श्रीगोंदा : लिलाव पध्दतीने लिंबू खरेदी करा..अन्यथा कारवाई  करू,  असा इशारा श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीने दिला आहे. मात्र श्रीगोंद्यातील लिंबू व्यापा-यांनी त्यास ठाम नकार दिला आहे. १२ जुलैपासून लिंबू खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला आहे. त्यामुळे श्रीगोंद्यात लिंबाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे.

शनिवारी (११ जुलै) पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या दालनात बाजार समिती संभाजी ब्रिगेड व लिंबू व्यापा-यांची बैठक झाली. दौलतराव जाधव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यास यश आले नाही.

व्यापा-यांनी लिलाव पध्दतीने लिंबू खरेदी करावे अन्यथा बाजार समिती परवाने रद्द करणार आहे, असा इशारा बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते यांनी दिला आहे. 

लिंबू खरेदीवरून व्यापारी व बाजार समितीत वाद टोकाला गेला आहे. लिंबू उत्पादक शेतक-यांचे हित विचारात घेऊन बाजार समिती काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. 

यावेळी सतिश पोखर्णा, आदिक वांगणे, प्रकाश सस्ते, सतिश बोरूडे उपस्थित होते. 

Web Title: Traders refuse to buy lemons in Shrigonda; The trade market committee's argument came to an end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.