भाजपातील निष्ठावंतांवर सतरंज्या उचलण्याची वेळ; सुषमा अंधारे यांची टीका

By अरुण वाघमोडे | Published: February 17, 2024 05:00 PM2024-02-17T17:00:16+5:302024-02-17T17:01:26+5:30

काँग्रेस-राष्ट्रवादीतून गेलेल्यांना भाजपात न्याय मिळतोय मात्र, भाजपातील निष्ठावंतावर सतरंज्याच उचलण्याची वेळ आली आहे.

time to crack down on BJP loyalists criticism of sushma andhare in ahmadnagar | भाजपातील निष्ठावंतांवर सतरंज्या उचलण्याची वेळ; सुषमा अंधारे यांची टीका

भाजपातील निष्ठावंतांवर सतरंज्या उचलण्याची वेळ; सुषमा अंधारे यांची टीका

अरुण वाघमोडे, अहमदनगर: काँग्रेस-राष्ट्रवादीतून गेलेल्यांना भाजपात न्याय मिळतोय मात्र, भाजपातील निष्ठावंतावर सतरंज्याच उचलण्याची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्याच नेत्यांना संपविण्याचे काम करत आहेत. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांना त्यांनी मोठा त्रास दिला. तावडे त्यांच्या तावडीत सापडले नाहीत, खडसे बाहेर पडले तर पाटील, बावनकुळे यांनी त्यांच्याशी जुळवून घेतले आहे. असे सांगत आता पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे अशी ऑफर शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली.

 शिवसेनेच्या मुक्त संवाद यात्रेनिमित्त नगर शहरात आलेल्या अंधारे यांनी शनिवारी (दि.१७) येथे पत्रकारपरिषद घेत सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या. भाजपाला ओबीसीची काळजी असती  तर त्यांनी ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असती. मुंडे यांनी आता जास्त अन्याय सहन करू नये. मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपा सोडवू शकते मात्र, त्यांना हा प्रश्न सोडवायचा नाही. हे सरकार आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा-ओबीसीमध्ये वाद लावत आहे. राज्यात सरकार प्रायोजित दंगली घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे व नितेश राणे यांचे वक्तव्य जनक्षोभ निर्माण करणारे ठरत आहेत. भाजपाने यांना वेळीच आवर घातली नाही तर राज्यातील परिस्थिती बिघडू शकते. पुणे येथे पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला झाला तेव्हा फडणवीस कुठे गेले होते. गुहागर प्रकरणानंतर मात्र त्यांना कंठ फुटला आहे. दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थती मोठे विदारक आहे. याकडे सरकारचे लक्ष्य नाही. असे अंधारे म्हणाल्या.

Web Title: time to crack down on BJP loyalists criticism of sushma andhare in ahmadnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.