शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

संगमनेरात अवैध मद्यविक्री करणा-या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 2:57 PM

तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात १७ हजार ५३५ रुपये किंमतीच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

संगमनेर : अवैध मद्यविक्री करणा-यांवर शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. पथकाने सोमवारी तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात १७ हजार ५३५ रुपये किंमतीच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे.पहिल्या घटनेत शहरानजीक असलेल्या कासारा दुमाला परिसरातील हॉटेल कल्पराज जवळील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला पोलिसांनी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात रामसिंग हेमसिंग सिंग (वय. ४५ रा. कासारा दुमाला, ता. संगमनेर) याच्याकडून १२ हजार ७३५ रूपये किंमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांनी फिर्याद दिली आहे.दुस-या घटनेत मालदाड रोड परिसरातील हॉटेल सुयोगच्या उजव्या बाजूस विदेशी दारूची विक्री करणाºया सचिन प्रकाश साळुंखे (रा. मालदाड रोड, ता. संगमनेर) याच्याकडून ३ हजार ६०० रुपये किंमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही घटना साडेचार वाजेच्या सुमारास घडली़ साळुंखे विरोधात पोलीस कॉन्स्टेबल सागर धुमाळ यांनी फिर्याद दिली.तिस-या घटनेत दिवटे किराणा स्टोअर्सच्या मागे संध्याकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात देशी मद्याच्या बाराशे रुपयांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील ढाकणे यांच्या फिर्यादीवरून अनिल बबन गायकवाड (वय. २८, रा. मालदाड रोड, ता. संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तीन ठिकाणी अवैध मद्यविक्री प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आशिष आरोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल ए. जी. लांडे, पोलीस नाईक एम. आर. सहाणे हे तपास करीत आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर