Three patients were found in Kopargaon on Friday | कोपरगावात शुक्रवारी तीन कोरोना रुग्ण आढळले

कोपरगावात शुक्रवारी तीन कोरोना रुग्ण आढळले

कोपरगाव : कोपरगावात शुक्रवारी (दि.२३ ) रॅपिड अ‍ॅटीजेन किटद्वारे ४२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३ व्यक्ती बाधित आढळल्या आहेत. १० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

२३ ऑक्टोबरअखेर २१०३ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यात ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या १६ बाधित व्यक्तींवर उपचार सुरू आहे. उर्वरित २०५० बाधित व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.  आतापर्यंत तालुक्यातील १२ हजार १६ व्यक्तींची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १ हजार ९१७ व्यक्तींची नगर येथे स्त्राव पाठवून तर १० हजार ९९ व्यक्तींची रॅपिड अ‍ॅटीजेन किटद्वारे तपासणी केली आहे.

Web Title: Three patients were found in Kopargaon on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.