शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

जामखेड तालुक्यात ११ हजार शेतक-यांना नुकसानीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 2:36 PM

जामखेड तालुक्यातील नान्नज, नायगाव व जामखेड मंडलाला अवकाळीचा तडाखा बसला. काढणीसाठी आलेला कांदा, सोयाबीन, कापूस, द्राक्ष बागांचे नुकसान झाले.

अशोक निमोणकर ।  जामखेड : तालुक्यातील नान्नज, नायगाव व जामखेड मंडलाला अवकाळीचा तडाखा बसला. काढणीसाठी आलेला कांदा, सोयाबीन, कापूस, द्राक्ष बागांचे नुकसान झाले. नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले आहे. ११ हजार १२४ बाधित शेतक-यांच्या ५ हजार २१५ हेक्टर क्षेत्रात साडेआठ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील काही भागात ओला तर काही भागात कोरडा दुष्काळ आहे. जामखेड, नान्नज, नायगाव या मंडलात कांदा, सोयाबीन, कापूस पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. पाण्यात भिजल्याने शेतात पुन्हा सोयाबीन पीक उगवून शेत हिरवीगार झाले आहेत. नान्नज परिसरात द्राक्ष बागा, कांदा, मका पिके उद्ध्वस्त झाले आहे. खरीप हंगामात ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. ९० दिवसात उडीद पिक थोड्याफार पावसात साधले जाते. यामुळे उडीदाची लागवड २९ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली होती. शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्याने उडीद पूर्ण वाया गेला. त्यामुळे बाजारपेठत उडदाला ४ हजार असणारा दर ९ हजारपर्यंत गेला. उडीद वाया गेला. कृषी कार्यालयाने क्रॉपकटींग करून अहवाल दिला आहे. त्यामुळे शेतक-यांना लाभ होईल पण तो केव्हा मिळेल, याबाबत विमा कंपनीचे कार्यालय नसल्याने माहिती मिळत नाही. त्यामुळे परतीच्या पावसाने तालुक्यातील बाधीत क्षेत्र कमी झाले आहे.नान्नजच्या उरेवस्ती येथे मागील २० वर्षापासून संतोष साधू मोहळकर व केशरबाई नामदेव मलंगनेर हे द्राक्ष फळबागांची लागवड करीत आहेत. यंदा अवकाळी पावसाने द्राक्षांची घडगळ झाली. त्यामुळे संपूर्ण द्राक्षबाग बाधित झाली, असे त्यांनी सांगितले.सोयाबीनला कवडीमोल भावकाढणीच्या वेळी झालेल्या पावसाने सोयाबीन काळे पडले आहे. बाजारपेठेत चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला ३ हजार ८०० रूपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र केवळ काही दाणे काळे पडल्याने सोयाबीनला व्यापारी दोन हजार रूपये दर देत आहेत. पावसात भिजलेला माल साठवून ठेवल्यास तो किती दिवस टिकेल याची शाश्वती नसल्याने शेतकरी तो साठवण्याऐवजी मिळेल त्या किमतीला विकत आहेत.

टॅग्स :JamkhedजामखेडCrop Insuranceपीक विमा