शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

ज्यांना सर्वांनी नाकारलं त्यांना ‘मानवसेवा’ने स्वीकारलं; लॉकडाऊन काळात १६ बेघर मनोरुग्णांना निवारा 

By अरुण वाघमोडे | Published: June 07, 2020 1:58 PM

रस्त्यावर भटकंती करणा-या बहुतांशी मनोरुग्ण, मतिमंद यांना कोरोनाच्या महामारीमुळे नातेवाईकांसह समाजानेही नाकारले. कुणाचाच आधार नसलेल्या या मनोरुग्णांना मानवसेवा प्रकल्पात स्वीकारून त्यांना निवारा दिला. लॉकडाऊन काळात १६ मनोरुग्णांना मानवसेवा पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यात ९ महिला व ७ पुरुषांचा समावेश आहे.

अहमदनगर : रस्त्यावर भटकंती करणा-या बहुतांशी मनोरुग्ण, मतिमंद यांना कोरोनाच्या महामारीमुळे नातेवाईकांसह समाजानेही नाकारले. कुणाचाच आधार नसलेल्या या मनोरुग्णांना मानवसेवा प्रकल्पात स्वीकारून त्यांना निवारा दिला. लॉकडाऊन काळात १६ मनोरुग्णांना मानवसेवा पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यात ९ महिला व ७ पुरुषांचा समावेश आहे.

नगर तालुक्यातील अरणगाव येथे श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ या संस्थेच्यावतीने गेल्या बारा वर्षांपासून मनोरुग्णांसाठी मानवसेवा हा प्रकल्प चालविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आजपर्यंत ५७६ बेघर मनोरुग्ण महिला व पुरुषांना उपचार देऊन त्यांच्या कुटुंबात परत पाठविले आहे. सध्या या प्रकल्पात ३० बेघर मनोरुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाच्या काळात रस्त्यावर आढळून आलेल्या मनोरुग्णांना कोठे दाखल करावयाचे हा प्रश्न पोलिसांसमोर होता. अशा परिस्थितीत मानवसेवा प्रकल्पाने मनोरुग्ण व्यक्तींना निवारा देत त्यांच्यावर उपचार सुरू केले. 

मनोरुग्णांसाठी शासकीय निवारा नाहीमहाराष्ट्रात मनोरुग्णांसाठी पुणे, ठाणे व नागपूर असे तीनच ठिकाणी हॉस्पिटल आहेत. या हॉस्पिटलची मर्यादाही प्रत्येकी १७०० इतकी आहे. त्यामुळे नगरमध्ये मनोरुग्णांसाठी कार्यरत असलेल्या खाजगी संस्था महत्त्वपूर्ण ठरत आहेत. सध्या कोरोनाच्या काळात रस्त्यावर आढळून येणा-या मनोरुग्णांना पोलीस याच संस्थेत दाखल करीत आहेत.

नेपाळचा मतिमंद युवक कुटुंबात परतला सुखरूपकोतवाली पोलिसांना केडगाव बायपास येथे ३० मार्च रोजी लॉकडाऊनकाळात एक बेवारस मतिमंद युवक (वय १८) आढळून आला होता. पोलिसांनी या युवकाला मानवसेवा प्रकल्पात दाखल केले होते. संस्थेने दीड महिना या युवकाला उपचार देत काळजी घेतली.  या युवकाला परत त्याच्या कुटुंबात पोहोच करण्यासाठी संस्थेच्यावतीने प्रयत्न करण्यात आले. अखेर या मतिमंद युवकाची ओळखही समोर आली. दीपक थापा असे नाव असलेल्या युवकाला त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. दीपक हा भोसरी एमआयडीसी येथे राहणारा होता.

रस्त्यावरील बेघर, निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी गेल्या बारा वर्षांपासून कार्यरत असलेल्या मानवसेवा प्रकल्पाला मदतीची गरज आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संस्थेला मिळणारा मदतीचा ओघ कमी झाला आहे. संस्थेकडील अन्नधान्य, किराणा, औषधे आणि इतर अत्यावश्यक वस्तुंचा साठा कमी झाला आहे. हे कार्य पूर्णत: लोकसहभागातून चालते. समाजातील दानशूर व्यक्तींनी संस्थेला मदत करावी.                                                                                                                                     -दिलीप गुंजाळ, संस्थापक, मानवसेवा प्रकल्प. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक