‘त्या’ दोन पोलिसांच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:15 AM2021-02-22T04:15:16+5:302021-02-22T04:15:16+5:30

शुक्रवारी (दि.१९) सकाळी ७ वाजता माहेगाव येथे साध्या गणवेशात आले. तेथे एका किराणा दुकानासमोर दडी धरून बसले. ...

‘Those’ two police interrogation orders | ‘त्या’ दोन पोलिसांच्या चौकशीचे आदेश

‘त्या’ दोन पोलिसांच्या चौकशीचे आदेश

Next

शुक्रवारी (दि.१९) सकाळी ७ वाजता माहेगाव येथे साध्या गणवेशात आले. तेथे एका किराणा दुकानासमोर दडी धरून बसले. सकाळी ८ वाजता श्रीरामपूर तालुक्यातील एक गुटखा, पानसुपारी, तंबाखू विक्री करणारा व्यापारी स्कुटीवरून आला. त्याने गाडीच्या पिशवीतून गुटखा काढून समोरच्या दुकानदारास देत असताना पोलिसांनी त्याला पकडले. गुटखा विक्रेत्याच्या गाडीवर साधारण लाखभर रुपयाचा पानमसाला व गुटखा होता. तो जप्त करून संबंधित व्यापाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. गुटखा खरेदी करणाऱ्या दुकानदारालाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे रवाना झाले. या घटनेची चर्चा काही वेळातच गावात पसरली. काही ग्रामस्थांनी संबंधित पोलिसांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून महाडिक सेंटर ते मुसळवाडी दरम्यान गाडी थांबविण्यास सांगितली. तेथे आम्ही येतो. आपण या घटनेवर चर्चा करून मार्ग काढू. परंतु, गुन्हा दाखल करू नका. गाव पुढाऱ्यांनी मुसळवाडी येथील एका हॉटेलवर बसून घडलेल्या घटनेवर चर्चा करून गुटखा व्यापारी व किराणा दुकानदार यांना सोडण्यासाठी ‘त्या’ दोन पोलिसांबरोबर आर्थिक तडजोड केली. यानंतर या दोन्ही व्यापाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल न करता पोलिसांनी सोडून दिले, असे प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्याने सांगितले. शनिवारी दिवसभर या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.

...

गुटखा जप्ती प्रकरणाची माहिती माझ्याकडे आली आहे. ‘त्या’ दोन पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीत ‘ते’ पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर खात्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे तो गुटखा पुरवठादार व दुकानदार यांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात येईल.

-संदीप मिटके, पोलीस उपअधीक्षक, श्रीरामपूर.

Web Title: ‘Those’ two police interrogation orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.