लाडू खात पेट्रोल दरवाढीवर चर्चा झडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:55 AM2021-02-20T04:55:45+5:302021-02-20T04:55:45+5:30

अहमदनगर : मनसेनेतर्फे गुरुवारी पारनेर तालुक्यातील पाच गावात दोनशे किलो लाडूंचे वाटप करण्यात आले. मनसे जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहोकले ...

There was a discussion on petrol price hike | लाडू खात पेट्रोल दरवाढीवर चर्चा झडली

लाडू खात पेट्रोल दरवाढीवर चर्चा झडली

Next

अहमदनगर : मनसेनेतर्फे गुरुवारी पारनेर तालुक्यातील पाच गावात दोनशे किलो लाडूंचे वाटप करण्यात आले. मनसे जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहोकले यांच्या पुढाकारातून पेट्रोलच्या दराचे शतक साजरे करण्यासाठी हे उपरोधिक आंदोलन करण्यात आले. ग्रामस्थांनीही लाडू खात पेट्रोल दरवाढीवर चर्चा केली. या अनोख्या आंदोलनाची ग्रामीण भागात चर्चा रंगली आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मनसेने जाहीर केल्याप्रमाणे गुरुवारी पारनेर तालुक्यात लाडू वाटप केले. पारनेर तालुक्यातील भाळवणी, भांडगाव, दैठणे गुंजाळ, ढवळपुरी, लोणी मावळा या गावांमध्ये लाडू वाटप करण्यात आले. भाळवणी, भांडगाव, दैठणे गुंजाळ, ढवळपुरी, लोणी मावळा अशा गावांमध्ये लाडू वाटप करण्यात आले. पेट्रोलच्या दराने शंभरी पूर्ण केल्यामुळे उपरोधिकपणे शतकपूर्तीचा फटाके फोडून उत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून लाडू आणले होते. केंद्र सरकारचा निषेध करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लाडू वाटप केले. गावकऱ्यांनीही इंधन दरवाढीवर चर्चा करत लाडू खाल्ले. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी नितीन भुतारे, शपाक हावलदार, वसिम राजे, सतीश म्हस्के, संदीप चव्हाण, किशोर जाधव, बाळासाहेब माने, संपत रोहोकले सहभागी झाले होते. ग्रामस्थांनीही यावेळी गर्दी केली होती.

--------------

शंभरी गाठत असल्याने लाडू वाटून उपरोधिकपणे केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. येणाऱ्या काळात जर पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा वेगळे आंदोलन करील. दरवाढीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. लोकांनीही या दरवाढीविरुद्ध मनसेकडे संताप व्यक्त केला.

-मारुती रोहोकले, मनसे जिल्हा उपाध्यक्ष

------------

फोटो- १८ मनसे

Web Title: There was a discussion on petrol price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.