गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; ‘छात्रभारती’ची मागणी

By शेखर पानसरे | Published: February 10, 2024 04:55 PM2024-02-10T16:55:07+5:302024-02-10T16:55:39+5:30

संगमनेर : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विधीज्ञ असीम सरोदे, विश्वंभर चौधरी  यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करावी. कायदा आणि सुव्यवस्था ...

The Home Minister should resign; Demand for 'Chhatra Bharati' | गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; ‘छात्रभारती’ची मागणी

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; ‘छात्रभारती’ची मागणी

संगमनेर : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विधीज्ञ असीम सरोदे, विश्वंभर चौधरी  यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करावी. कायदा आणि सुव्यवस्था राहावी, याकरिता महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली आहे. त्या संदर्भाने शनिवारी (दि. १०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन पाठविण्यात आले.

राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष ॲड. समीर लामखडे, छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, तुषार पानसरे, गणेश जोंधळे, मोहम्मद तांबोळी, सुयश गाडे, सुयश गाडे, सूरज शेलार, राहुल जऱ्हाड, श्रावणी गायकवाड, सुहानी गुंजाळ, भारत सोनवणे, पूर्वा शिरसाठ आदी यावेळी उपस्थित होते. उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांनी निवेदन स्वीकारले.

Web Title: The Home Minister should resign; Demand for 'Chhatra Bharati'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.