शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

शेवगाव येथील श्रीराम मंदिराच्या भूखंडाच्या भाडेकरारासाठी आता निविदा निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 11:03 AM

शेवगाव येथील श्रीराम मंदिराचे भूखंड भाडेकराराने देताना आता निविदा काढूनच भाडेकरार केले जावेत, असा आदेश धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिला आहे. त्यामुळे जुन्याच भाडेकरुंशी करार करण्याची देवस्थानच्या विश्वस्तांची पद्धत आता मोडीत निघणार आहे. 

लोकमत इफेक्ट/सुधीर लंके अहमदनगर : शेवगाव येथील श्रीराम मंदिराचे भूखंड भाडेकराराने देताना आता निविदा काढूनच भाडेकरार केले जावेत, असा आदेश धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिला आहे. त्यामुळे जुन्याच भाडेकरुंशी करार करण्याची देवस्थानच्या विश्वस्तांची पद्धत आता मोडीत निघणार आहे. श्रीराम मंदिराच्या देखभालीसाठी इनाम म्हणून मिळालेल्या ३१ एकर भूखंडाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर सुरु असल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले आहे. या भूखंडाचे तुकडे तीन वर्षाच्या करारावर घेऊन अनेकांनी त्यावर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. आपली स्वत:ची मालमत्ता असल्यासारखा या भूखंडांचा वापर सुरु झाला होता. ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेनंतर या सर्व व्यवहाराची चौकशी सुरु झाली आहे. विश्वस्तांनी ठराविक नागरिकांना हे भूखंड भाडेकरारावर दिले आहेत. तीन वर्षानंतर त्याच भाडेकरुंशी पुन्हा करार केले जात होते. यात देवस्थानचे नुकसान होत होते. काही भाडेकरुंनी तर या जागेत चक्क परमीट रुम थाटले आहेत. सहधर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेऊन यापुढे करार संपल्यानंतर निविदा काढूनच भूखंड भाड्याने द्या, असा आदेश केला आहे. निविदा पद्धतीमुळे अनेक नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होता येईल. त्यात देवस्थानला अधिक भाडेही मिळणार आहे. शिवाय तीन वर्षानंतर पुन्हा निविदा निघणार असल्याने भूखंडांवर पक्के बांधकाम करुन ते मालकीहक्काप्रमाणेही वापरता येणार नाहीत. ज्या भाडेकरुंचे करार संपले त्यांना अशा नोटिसा देण्यास देवस्थानने सुरुवात केली आहे. भूखंडांचा ताबा सोडा व पुन्हा भाडेकरार करावयाचा असेल तर निविदा प्रक्रियेत सहभागी व्हा, असे पत्र देवस्थानने काढले आहे. निविदा काढूनच भाडेकरार सह धर्मादाय आयुक्तांनी निविदा काढूनच भूखंडाचे भाडेकरार करा, असा आदेश दिला आहे. त्याप्रमाणे अंमलबजावणी करणार असल्याचे देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने ‘लोकमत’ला सांगण्यात आले.‘धर्मादाय’च्या अधिकाºयांबद्दलही तक्रारनगरच्या धर्मादाय उपआयुक्त कार्यालयातील अधिकाºयांनी या देवस्थानची चौकशी करताना मुद्दामहून अनियमितेकडे दुर्लक्ष केले, अशी तक्रार सय्यद आयुब यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. या तक्रारीची पुण्याच्या सहआयुक्तांनी चौकशी सुरु केली आहे.  या चौकशीत आयुब यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. अशीच तक्रार ‘मोहटा’ देवस्थानच्या चौकशी प्रकरणात नामदेव गरड यांनी केली आहे. धर्मादायचे नगरचे अधिकारी जाणीवपूर्वक या चौकशीस विलंब लावत आहेत, अशी त्यांची तक्रार आहे. त्याही तक्रारीची चौकशी सुरु आहे. 

टॅग्स :ShevgaonशेवगावRam Mandirराम मंदिर