शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

सरस्वती नदीत कोसळला टेम्पो; दहा प्रवाशी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 3:38 PM

श्रीगोंदा : तालुक्यातील शेडगाव-पेडगाव रस्त्यावर असणा-या सरस्वती नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना चालकाने धाडस करुन टेम्पो पाण्यात घातला़ मात्र, पुराच्या वेगामुळे हा टेम्पो नदीत कोसळला़ दरम्यान टेम्पोतील दहाही प्रवाशांनी प्रसंगावधान राखीत बाजूला उड्या घेत जीव वाचवले़ ही घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.तालुक्यात सर्वत्र धो धो पाऊस पडत ...

श्रीगोंदा : तालुक्यातील शेडगाव-पेडगाव रस्त्यावर असणा-या सरस्वती नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना चालकाने धाडस करुन टेम्पो पाण्यात घातला़ मात्र, पुराच्या वेगामुळे हा टेम्पो नदीत कोसळला़ दरम्यान टेम्पोतील दहाही प्रवाशांनी प्रसंगावधान राखीत बाजूला उड्या घेत जीव वाचवले़ ही घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.तालुक्यात सर्वत्र धो धो पाऊस पडत आहे. नदी- नाल्याना पूर आला आहे. पेडगाव परिसरात असणा-या सरस्वती पुलावरून शुक्रवार सकाळपासून पाणी वाहत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. दरम्यान शनिवारी सकाळी काष्टीचा बाजार असल्याने राशीन, भिगवण परिसरातून येणा-या बाजारकरुची मोठी गैरसोय झाली़ राशीन परिसरातील एक पिकअप टेम्पो काष्टी येथे दहा प्रवाशाना घेऊन निघाला होता़ या पिक अपमध्ये काही दुचाकीही होत्या. पिकअप सरस्वती नदीवरील पुलावरून जात असताना चालकाला पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा वेग जास्त असल्याने टेम्पो प्रवाहासोबत नदीत कोसळला. दरम्यान चालकाने पुरात टेम्पो घालताच प्रवाशांनी धोका ओळखून बाजूला उड्या मारल्या़ त्यामुळे सर्व प्रवाशी बचावले़ परिसरातील नागरिकांनी मदतकार्य करीत हा पिकअप टेम्पो पाण्याबाहेर काढला.