शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

शिक्षक दिन विशेष : २८ वर्षे बिनपगारी नोकरी, खडू आणि फावड्याचा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 12:31 PM

गेली अठ्ठावीस वर्षे अकरा ते पाच खडू फळा आणि सुटीच्या दिवशी व फावल्या वेळात शेतात फावडे असा दुहेरी संघर्ष करण्याची वेळ ज्ञानदान करणाऱ्या कोतूळ येथील शिवाजी विठ्ठल देशमुख व बाळासाहेब रामचंद्र बुरके या दोन शिक्षकांवर शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे आली आहे.

मच्छिंद्र देशमुखकोतूळ : गेली अठ्ठावीस वर्षे अकरा ते पाच खडू फळा आणि सुटीच्या दिवशी व फावल्या वेळात शेतात फावडे असा दुहेरी संघर्ष करण्याची वेळ ज्ञानदान करणाऱ्या कोतूळ येथील शिवाजी विठ्ठल देशमुख व बाळासाहेब रामचंद्र बुरके या दोन शिक्षकांवर शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे आली आहे.शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’ने विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यातून हे वास्तव समोर आले. कोतूळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात शिवाजी देशमुख १९९० ला रूजू झाले. त्यांचे शिक्षणही बी.ए., बीपीएड, तर बाळासाहेब रामचंद्र बुरके याच शाळेत एम.ए पर्यंत शिक्षण घेऊन प्रयोगशाळा परिचर म्हणून रुजू झाले. या विनाअनुदानित शाळेला आज ना उद्या.. अनुदान मिळेल या भाबड्या आशेवर ते चक्क २८ वर्षे सेवा करीत राहिले. मात्र आज वयाची ५३ वर्षे उलटली तरी त्यांना पगार मिळेना उलट शिक्षण संस्थेची टोलवाटोलवी व शिक्षण विभागाच्या अधिकाºयांचा जाणीवपूर्वक अर्थपूर्ण खोडसाळपणामुळे या दोन शिक्षकांना अक्षरश: शेतात राबण्याची वेळ आली आहे. विनाअनुदानित शाळांमध्ये हे प्रकार सगळीकडे पहायला मिळतात. मात्र शिवाजी देशमुख यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. तरीही अजूनही पगाराची वाट पाहत आहेत. शिक्षण संस्थेत एका जागेसाठी चार-चार शिक्षक नेमण्याच्या यंत्रणेचे ते बळी ठरले आहेत. यासाठी वेळप्रसंगी बुरके व देशमुख यांनी बटईने शेती केली. तर कधी हात उसने करीत कर्ज घेतले. कधी शेतमजुरी देखील केली. हा सर्व घामाचा पैसा न्यायालयाच्या लढाईत खर्च झाला. त्यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. तरीही गेली अठ्ठावीस वर्षे ते संघर्ष करीत आहेत. आजही अकरा ते पाच या वेळेत ते शाळेत शिकवून पोटासाठी शेतात राबतात. शिक्षण विभाग कधी न्याय देणार या प्रतीक्षेत ते आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले