लसीकरणासाठी शिक्षकांनी केले अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 03:44 PM2021-05-19T15:44:29+5:302021-05-19T15:44:51+5:30

कोरोना महामारी विरुद्धच्या लढ्यात प्राथमिक शिक्षकांची फ्रंटलाइन वर्कर म्हणून गणना करा, सर्वच शिक्षकांचे लसीकरण करा, या मागणीसाठी राहुरी तालुक्यात शिक्षक परिषदेच्या वतीने आत्मक्लेश व अन्नत्याग आंदोलन मंगळवारी करण्यात आले.

Teachers abstain from food for vaccination | लसीकरणासाठी शिक्षकांनी केले अन्नत्याग

लसीकरणासाठी शिक्षकांनी केले अन्नत्याग

Next

राहुरी : कोरोना महामारी विरुद्धच्या लढ्यात प्राथमिक शिक्षकांची फ्रंटलाइन वर्कर म्हणून गणना करा, सर्वच शिक्षकांचे लसीकरण करा, या मागणीसाठी राहुरी तालुक्यात शिक्षक परिषदेच्या वतीने आत्मक्लेश व अन्नत्याग आंदोलन मंगळवारी करण्यात आले.

जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेपैकी कोणतेही केडर लसीकरणाशिवाय कामकाज करत नाही. प्राथमिक शिक्षकांनी नुकतेच माझे कुटुंब माझी जबाबदारी हे सर्वेक्षण घरोघर जाऊन पूर्ण केले. त्या सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी फक्त प्राथमिक शिक्षक हा एकच घटक लसीकरणाशिवाय काम करत होता. इतर अनेक जिल्ह्यात शिक्षकांचे प्राधान्याने दोन्ही डोसचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण केले. अहमदनगर जिल्हा प्रशासनानेच याबाबत उदासीनता का दाखवली. शिक्षकांना लस नाही तर मग काम तरी का दिले जाते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या गोष्टीचा प्रतिनिधिक निषेध म्हणून अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने एक दिवसाचे आत्मक्लेष व अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

कोविड १९ महामारीच्या अनुषंगाने सर्व प्राथमिक शिक्षकांची गणना फ्रंटलाइन वर्कर म्हणून करावी.

प्रत्येक तालुक्यात ज्या शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही. त्या शिक्षकांचे सरसकट करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र एक दिवसाचे लसीकरण सत्र आयोजित करण्याचे आदेश जिल्हास्तरावरून पारीत व्हावेत. आदी प्रमुख मागण्या या आंदोलनात करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येऊन आंदोलन न करता सर्वांनी स्वतंत्र आंदोलन केले. आंदोलनाला राहुरीत प्रचंड प्रतिसाद मिळाला.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिक्षक परिषदेचे जिल्हा नेते रवींद्र अरगडे, विभागीय उपाध्यक्ष शंकर गाडेकर, जिल्हा मार्गदर्शक कल्याण राऊत, नगरपालिका शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल लांबे, मनोज पालवे, बाळासाहेब गोरे आदी शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

Web Title: Teachers abstain from food for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.