टेंडर घोटाळ्यातील दोघांचे निलंबन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 04:32 PM2019-05-03T16:32:33+5:302019-05-03T16:32:50+5:30

जिल्हा परिषदेतील टेंडर घोटाळ्याप्रकरणाचा चौकशी अहवाल गुरुवारी (दि़०२) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना सादर करण्यात आला असून, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़

Suspension of Tender scam? | टेंडर घोटाळ्यातील दोघांचे निलंबन?

टेंडर घोटाळ्यातील दोघांचे निलंबन?

Next

अहमदनगर : जिल्हा परिषदेतील टेंडर घोटाळ्याप्रकरणाचा चौकशी अहवाल गुरुवारी (दि़०२) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना सादर करण्यात आला असून, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़
नेवासा तालुक्यातील पाचेगाव पाणी योजनेतील टेंडर घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लघुपाटबंधारे विभाग, बांधकाम (दक्षिण व उत्तर) विभागातील ७०० टेंडरची चौकशी जिल्हा परिषदेने सुरु केली होती़ सामान्य प्रशासन विभागातील कार्यालयीन अधीक्षक प्रमोद राऊत, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) कासार यांची द्विसदसीय समिती या चौकशीसाठी नेमण्यात आली होती़ या समितीने तब्बल ७०० फाईल तपासून चौकशी पूर्ण केली असून, या चौकशीचा गोपनीय अहवाल बंद पाकिटात गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांना सादर करण्यात आला आहे़ या अहवालानुसार पाचेगाव येथील पाणी योजनेत घोटाळा करणाºया दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे सांगण्यात आले़
पाचेगाव (ता़ नेवासा) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाचेगाव पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती़ १ कोटी ४५ लाख रुपयांच्या या कामासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून आॅनलाईन पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली़ यात एका ठेकेदाराने सर्वात कमी म्हणजे १ कोटी २० लाख रुपये (उणे तीन टक्के) रकमेचे टेंडर भरले होते़ ते आॅनलाईन मंजूरही करण्यात आले़ मात्र, कार्यारंभ आदेश देताना ज्या ठेकेदाराने ६ टक्के जास्त रकमेची निविदा भरली होती, त्या ठेकेदाराच्या नावाने कार्यारंभ आदेश काढण्यात आला होता़ त्यामुळे संबंधित ठेकेदाराला निविदा रकमेपेक्षा सुमारे ९ लाख रुपये जास्तीचे मिळणार होते़ याबाबत तक्रार आल्यानंतर या टेंडर प्रक्रियेची चौकशी करण्यात आली़ त्यात हा टेंडर घोटाळा उघडकीस आला होता़

Web Title: Suspension of Tender scam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.