पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरण : आमदार जगताप-कर्डिलेंसह ११९ जणांवर दोषारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 11:22 AM2018-09-19T11:22:49+5:302018-09-19T11:22:53+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात घुसून तोडफोड करत आमदाराला पळवून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरूण जगताप

Superintendent of Police in the case: 112 accused including Jagtap-Kardillan; | पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरण : आमदार जगताप-कर्डिलेंसह ११९ जणांवर दोषारोप

पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरण : आमदार जगताप-कर्डिलेंसह ११९ जणांवर दोषारोप

googlenewsNext
ठळक मुद्देकळमकर, विधातेंसह आजी-माजी नगरसेवकांचा समावेश

अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात घुसून तोडफोड करत आमदाराला पळवून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरूण जगताप यांच्यासह ११९ जणांविरोधात मंगळवारी पोलिसांनी १ हजार ९६ पानांचे जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांना अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलाविले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून तेथे तोडफोड करत जगताप यांना पळवून नेले. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल संदीप घोडके यांच्या फिर्यादीवरून ३०० जणांवर गुन्हा दाखल केला होता. तपासात १२६ जणांची नावे समोर आली. यातील कैलास गिरवले यांचा मृत्यू झाला तर चार जणांची नावे गुन्ह्यातून वगळण्यात आली तर दोन वेळा नावाचा उल्लेख असलेला आरोपी एकच असल्याचे समोर आल्याने न्यायालयात अंतिमत: ११९ जणांविरोधात तपासी अधिकारी कैलास देशमाने यांनी दोषारोपपत्र दाखल केले. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ़ शरद गोर्डे यांनी केला, नंतर हा तपास देशमाने यांच्याकडे आला़ या गुन्ह्यात अटक केलेल्या सर्वांना न्यायालयात जामीन मंजूर झाले आहेत. दोषारोपपत्रात सात महिलांच्या नावाचाही समावेश आहे. लोकसेवकाला कर्तव्यापासून अडविणे, त्यांच्यावर हल्ला, दुखापत, दंगा करणे, बेकायदेशीर जमावाचा घटक असणे, धाकदपटशहा, कायदेशीर अटकेला विरोध करणे आदी कलमांतर्गत ११९ जणांवर दोष ठेवण्यात आलेला आहे.

माजी महापौर, नगरसेवकांचा समावेश
आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरूण जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, सचिन जगताप, शीतल जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक कुमार वाकळे, विपुल शेटिया, संपत बारस्कर, माजी नगरसेवक निखिल वारे, प्रा़ माणिक विधाते, प्रसन्न जोशी, शरिफ शेख, राहुल चिंतामणी, सय्यद आर्शिद अकबर, आवेश जब्बार शेख, सय्यद जाएद असिफ, सागर वाव्हळ, संजय वाल्हेकर, अनिल राऊत, अनिकेत चव्हाण, गिरीष गायकवाड, दीपक घोडेकर, रियाज तांबोळी, दत्ता उगले, कुुणाल घोलप, साईनाथ लोखंडे, सचिन गवळी, सोमनाथ गाडळकर, संतोष सूर्यवंशी, धर्मा करांडे, इम्रान शेख, प्रकाश भागानगरे, गजानन भांडवलकर, घनश्याम बोडखे, सारंग पंधाडे, मतीन सय्यद, सुरेश बनसोडे, बबलू सूर्यवंशी, संजय गाडे, धनंजय गाडे, गहिनीनाथ दरेकर, सागर ठोंबरे, विक्रम शिंदे, सत्यजित ढवण, वैभव ढाकणे, संभाजी पवार, अफजल शेख, कुलदीप भिंगारदिवे, चंद्रकांत औशीकर, सुहास शिरसाठ, अविनाश घुले आदींसह ११९ जणांचा समावेश आहे.

यांची नावे वगळली
पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडीच्या गुन्ह्यातून अभिजित भगवान खोसे, सय्यद अब्दुल रहिम अब्दुल रौफ उर्फ सादिक रौफ सय्यद, राजेश गणपत परकाळे व निलेश कन्हैयालाल बांगरे यांची नावे वगळण्यात आली आहेत.

दहा जण फरार
मुसा सादिक शेख, सागर डोंबरे, वैभव वाघ, मयूर राऊत, मोमीन शेख, ईश्वरदार ठाकूरदास नवलाणी, विकी जगताप, मोनिका पवार, राम्या (पूर्ण नाव माहित नाही), आनंद सूर्यवंशी हे अद्याप फरार आहेत.

Web Title: Superintendent of Police in the case: 112 accused including Jagtap-Kardillan;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.