शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

पब्जीच्या आहारी गेल्याने आयटी इंजिनिअरची गोळी झाडून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 12:24 PM

तालुक्यातील टाकळीभान येथील प्रगतशील शेतकरी राहुल नानासाहेब पवार (वय २८) यांनी बुधवारी रात्री अडीच वाजेच्या दरम्यान पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली.

श्रीरामपूर : तालुक्यातील टाकळीभान येथील प्रगतशील शेतकरी राहुल नानासाहेब पवार (वय २८) यांनी बुधवारी रात्री अडीच वाजेच्या दरम्यान पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी पब्जी गेमच्या आहारी गेल्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.श्रीरामपूर बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार यांचे ते चिरंजीव होते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले राहुल यांनी शेती करण्याचा मार्ग पत्करला. पोल्ट्री व्यवसायामध्ये ते उतरले होते. सहा महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. दरम्यान, पब्जी गेमच्या आहारी गेल्यानेच त्यांनी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने हा खेळ खेळत होते. पब्जीमुळे आत्महत्या केल्याची अशा स्वरुपाची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी रमजान ईदच्या दिवशी आंबी येथे एका युवकाने आत्महत्या केली होती. श्रीरामपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर