यंदा दोन महिन्यातच थंडावणार साखर कारखान्यांचा ‘बॉयलर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:10 PM2019-11-22T12:10:40+5:302019-11-22T12:10:58+5:30

यंदा जिल्ह्यातील साखर कारखाने साधारपणे ६० ते ७० दिवसच चालतील, असा प्राथमिक अंदाज असून, ऊस मिळविण्याचे मोठे आव्हान जिल्ह्यातील साखर कारखानदारांसमोर आहे.

Sugar boilers to cool down in two months | यंदा दोन महिन्यातच थंडावणार साखर कारखान्यांचा ‘बॉयलर’

यंदा दोन महिन्यातच थंडावणार साखर कारखान्यांचा ‘बॉयलर’

Next

अण्णा नवथर । 
अहमदनगर : गतवर्षीच्या भीषण दुष्काळामुळे जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे. जनावरांचा चारा म्हणून उसाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. परिणामी गाळपासाठी ऊस कमी शिल्लक राहिला.  त्यामुळे यंदा जिल्ह्यातील साखर कारखाने साधारपणे ६० ते ७० दिवसच चालतील, असा प्राथमिक अंदाज असून, ऊस मिळविण्याचे मोठे आव्हान जिल्ह्यातील साखर कारखानदारांसमोर आहे.
 यंदाच्या ऊस गाळप हंगामाला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे.  सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस गाळपाचा १ कोटी मेट्रीक टनाचा टप्पा पार केला होता. परंतु, गतवर्षी दुष्काळ असल्याने ऊस उत्पादक शेतकºयांनी उसाची लागवड केली नाही. कृषी विभागाचा अहवाल पाहता जिल्ह्यातील ७० हजार ९११ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झालेली आहे. परंतु, गेल्या वर्षभरात भीषण दुष्काळ पडला. जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला. हिरवा चारा उपलब्ध नव्हता.  उन्हाळ्यात उसाला पुरेल एवढे पाणी नव्हते. शेतक-यांचाही नाईलाज होता. त्यांनी ऊस जनावरांना चारा म्हणून विकला. त्यामुळे उसाचे क्षेत्र कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात तेवढा ऊस शिल्लक राहिलेला नाही. त्याचा परिणाम यंदाच्या ऊस गाळप हंगामावर झाला आहे. उसाअभावी जिल्ह्यातील नऊ साखर कारखाने बंद राहणार आहेत. उर्वरित १४ साखर कारखाने सुरू होतील. त्यांना गाळपासाठी परवानगीही देण्यात आलेली आहे. परंतु, तेही जास्त काळ चालू शकणार नाहीत.
साधारणपणे ६० ते ९० दिवस जिल्ह्यातील करखाने चालतील, असा प्राथमिक अंदाज आहे.  ऊस क्षेत्र घटल्यामुळे ऊस मिळविण्यासाठी कारखान्यांची यंत्रणा कामाला लागली आहे.  ऊस मिळविण्यासाठी कारखान्यांमध्ये कमालीची स्पर्धा असून, अन्य जिल्ह्यातून ऊस आणण्याची तयारी कारखान्यांकडून सुरू आहे.
हे कारखाने होणार सुरू
अगस्ती सहकारी साखर कारखाना, डॉ़ पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, श्री़ ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, कुकडी सहकारी साखर कारखाना, मुळा सहकारी साखर कारखाना, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, श्री वृध्देश्वर,  संजीवनी,  श्री क्रांती शुगर, गंगामाई, श्री अंबिका, श्री साईकृपा, युटेक शुगऱ 
उसाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
    नगर ६६६, पारनेर १,७९३, श्रीगोंदा ११,१७९, कर्जत २,५७६, जामखेड ६५९, शेवगाव १०,१२९, पाथर्डी ३,२०३, नेवासा १३,०९७, राहुरी११,२८१, संगमनेर ३,९०८, अकोले ३,४०५, कोपरगाव ३,६९२, श्रीरामपूर ३,५११, राहाता १,७९४़

Web Title: Sugar boilers to cool down in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.