चापडगाव विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:25 AM2021-08-22T04:25:47+5:302021-08-22T04:25:47+5:30

लाडजळगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा घेण्यात आलेल्या एनएमएमएस परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. चापडगाव (ता. शेवगाव) ...

Success in scholarship examination of students of Chapadgaon Vidyalaya | चापडगाव विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

चापडगाव विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

Next

लाडजळगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा घेण्यात आलेल्या एनएमएमएस परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. चापडगाव (ता. शेवगाव) विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.

२०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत विद्यालयातील एकूण २९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १५ विद्यार्थी उत्तीर्ण असून, यामधील ऋतुजा भाऊराव जाधव १२५ गुण मिळवून प्रथम, ऋषिकेश दत्तात्रय सुरासे १०५ गुण मिळवून द्वितीय, तर प्रणव देवीदास दराडे ८४ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना ४ वर्षे शासनाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. सर्व उत्तीर्ण, शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे, जिप सदस्या हर्षदा काकडे, शैक्षणिक विभागप्रमुख प्रा. लक्ष्मण बिटाळ, विद्यालयाचे प्राचार्य मगर, उपमुख्याध्यापक गणपत शेलार, पर्यवेक्षक गोर्डे, बहिस्त परीक्षा विभाग प्रमुख जी.ए. मोरे, ए.पी. सोनवणे यांनी कौतुक केले.

---

२१ ऋतुजा जाधव

Web Title: Success in scholarship examination of students of Chapadgaon Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.