भेंडा गोळीबारातील जखमीची गोळी काढण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:22 AM2021-05-09T04:22:34+5:302021-05-09T04:22:34+5:30

भेंडा : भेंडा बुद्रूक (ता. नेवासा) येथे २ मे रोजी मित्रांसोबत व्हाॅलीबाॅल खेळताना झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या सोमनाथ तांबे ...

Success in removing bullet wound from sheep shooting | भेंडा गोळीबारातील जखमीची गोळी काढण्यात यश

भेंडा गोळीबारातील जखमीची गोळी काढण्यात यश

Next

भेंडा : भेंडा बुद्रूक (ता. नेवासा) येथे २ मे रोजी मित्रांसोबत व्हाॅलीबाॅल खेळताना झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या सोमनाथ तांबे यांच्यावर पुणे येथील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया करून त्याच्या छातीत रुतून बसलेली गोळी काढण्यात यश आले आहे. सोमनाथची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली आहे.

रविवारी रात्री लांडेवाडी येथे मित्रांसोबत व्हाॅलीबॉल खेळत असताना सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय २१, रा. लांडेवाडी, भेंडा) याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला होता. गोळी लागून जखमी झालेल्या अवस्थेत त्याला त्याच्या मित्रांनी नेवासा येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर त्याला नगर येथे आणि नंतर पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले. पुणे येथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आल्याची माहिती नातेवाइकांकडून मिळाली आहे.

Web Title: Success in removing bullet wound from sheep shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app