विद्यार्थ्यांनी दुष्काळी विषयावर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST2021-01-15T04:17:35+5:302021-01-15T04:17:35+5:30

जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले ...

Students should focus on the topic of drought | विद्यार्थ्यांनी दुष्काळी विषयावर भर द्यावा

विद्यार्थ्यांनी दुष्काळी विषयावर भर द्यावा

जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कार्यशाळेत अग्रवाल बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन आर.सी. अग्रवाल बोलत होते. याप्रसंगी संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक शरद गडाख, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक किरण कोकाटे, कार्यक्रमाचे निमंत्रक सुनिल गोरंटीवार, सहनिमंत्रक सारंग नेरकर, सुहास जोशी, मुकुंद शिंदे उपस्थित होते.

यावेळी झालेल्या तज्ञ मंडळाच्या चर्चेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु आर.बी. देशमुख, कामधेनु विद्यापीठाचे माजी कुलगुरु एम. सी. वार्ष्णेय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु बी. वेंकटेश्वरलु, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु व्यंकटराव मायंदे, पोकरा मुंबईचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी सहभाग घेतला.

Web Title: Students should focus on the topic of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.