शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

विद्यार्थ्यांनी ध्येयवेडे होऊन यशाचे स्वप्न पहावे : मिलिंद शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 5:20 PM

नगरच्या विविध महाविद्यालयांमधून अनेक अभिनेते घडले. आज मी चित्रपटसृष्टीत यशस्वी होऊन अभिनेता म्हणून तुमच्या समोर उभे असल्याचा अभिमान वाटत आहे.

अहमदनगर : नगरच्या विविध महाविद्यालयांमधून अनेक अभिनेते घडले. आज मी चित्रपटसृष्टीत यशस्वी होऊन अभिनेता म्हणून तुमच्या समोर उभे असल्याचा अभिमान वाटत आहे. त्यावेळी सारडा महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व मित्रांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे ध्येय गाठू शकलो. ‘रे राया’ हा चित्रपट अशाच ध्येयवेड्या युवकाचा आहे. माझ्यासाठीही टाळ्या वाजल्या पाहिजे, असे जे स्वप्न पाहतात, तेच यशाच्या शिखरावर जातात. विद्यार्थ्यांनीही जीवनामध्ये कायम ध्येयवेडे होऊन यशाचे स्वप्न पहावे, असे मत नगरचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांनी व्यक्त केले.अभिनेते मिलिंद शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला ‘रे राया’ या मराठी चित्रपटाचे प्रमोशन पेमराज सारडा महाविद्यालयात झाले. यावेळी दिग्दर्शक मिलिंद शिंदे बोलत होते.भूषण प्रधान म्हणाले, आतापर्यंत बऱ्याच स्पोटर््स विषयावर चित्रपट झाले. मात्र रनिंग, हाय जंम्प व तिरंदाजी हे तीन खेळ एकाच चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मिलिंद शिंदे यांनी अत्यंत उत्कृष्टपणे हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. नगरमध्ये फार सुंदर व चांगले लोकेशन आहेत. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सुनील रामदासी म्हणाले, मिलिंद शिंदे पेमराज सारडा महाविद्यालयातून शिक्षण घेऊन चित्रपटसृष्टीत गेला आहे. त्याने दिग्दर्शित केलेला या पहिल्याच चित्रपटाचे प्रमोशन सारडा महाविद्यालयात झाले.चित्रपटातील प्रमुख नायक भूषण प्रधान, नायिका संस्कृती बालगुडे, निर्माते संजय पोपटानी आदी उपस्थित होते. हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, सचिव सुनील रामदासी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अमरजा रेखी, उपप्राचार्य प्रा. ज्ञानदेव जाधव, प्रबंधक अशोक असेरी, पर्यवेक्षक मंगला भोसले आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मिलिंद शिंदे यांनी ‘रे राया’ या चित्रपटाबद्दल सविस्तर माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. यावेळी मिलिंद शिंदे व उपस्थित अभिनेत्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर