शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By admin | Published: April 15, 2016 11:00 PM

जवळे : शिरूर-निघोज रस्त्यावर पारनेर तालुक्यातील जवळे येथे शेतकऱ्यांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

आणेवारी कमी करा : विश्वनाथ कोरडे यांचा बेमुदत उपोषणाचा इशाराजवळे : शिरूर-निघोज रस्त्यावर पारनेर तालुक्यातील जवळे येथे शेतकऱ्यांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले. कुकडीपट्ट्यातील १४ गावातील ५० पेक्षा जादा असणारी आणेवारी कमी करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन नायब तहसीलदार सी. सी. दिवाणे यांनी दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. पारनेर तालुक्यातील कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावात पाण्याअभावी कोट्यवधी रुपयांच्या फळबागा आणि शेतीचे नुकसान झालेले आहे. जवळे, गुणोरे आणि निघोज परिसरातील १४ गावे कुकडीपट्ट्यात मोडतात. येथील गावांची आणेवारी ५० टक्कयांपेक्षा अधिक असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासन दरबारी कळवले आहे. श्रीगोंदा तालुक्यात कुकडीचे दोन कालवे असताना तेथील गावांची आणेवारी ५० टक्कयांपेक्षा कमी कशी, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपा तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेणार नसेल तर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला. शेतकरी तीन तास आंदोलन करत असताना महसूल विभागाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी आला नाही, ही बाब अत्यंत खेदाची आणि निषेधाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जवळा सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी सालके यांनी सोसायटीने शेतकऱ्यांना यंदा फळबागासाठी ७ कोटी रुपयांचे कर्ज दिलेले आहे. शासनाने या भागातील फळबागांचा १३ लाख रुपयांचा विमा उतरवलेला आहे. मात्र, विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी या भागात फिरकला नसल्याचा आरोप त्यांनी केला. हा प्रकार शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासारखा आहे. शेतकरी सोसायट्यांचे कर्ज कसे फेडणार, असा सवाल आंदोलनकर्त्यांच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. आंदोलनात जवळेचे सरपंच किसन रासकर, राळेगण थेरपाळचे सरपंच कैलास डोमे, गांजीभोयरेचे सरपंच आबासाहेब खोडदे, रासपाचे तालुकाध्यक्ष सतीश गोगडे, प्रदीप सोमवंशी, सुभाष खोसे, मोहन आढाव, बाळासाहेब कारखले आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)