शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

रेल्वे स्टेशनची शाळा सुरु करा : पालक - विद्यार्थ्यांचा पालिकेच्या सभेत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 1:17 PM

महापालिकेच्या बंद करण्यात आलेल्या रेल्वे स्टेशन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील आठवी ते दहावीचे वर्ग यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून बंद करण्यात आले.

अहमदनगर : महापालिकेच्या बंद करण्यात आलेल्या रेल्वे स्टेशन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील आठवी ते दहावीचे वर्ग यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून बंद करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी मंगळवारी महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत येऊन गोंधळ घातला.दहा वर्षांपूर्वी महापालिकेच्या शिक्षण मंडळाने महापालिकेच्या रेल्वे स्टेशन येथील शाळेत माध्यमिक विभाग सुरू केला. तत्कालीन सभापतींच्या मान्यतेचे या शाळेत शिक्षक, मुध्याध्यापक, शिपाई ही पदे भरण्यात आली. तिन्ही वर्ग सुरू झाले. रेल्वे स्टेशन परिसरातील मागासवर्गीय, गोर-गरीब विद्यार्थ्यांना या शाळेचा लाभ मिळाला. मात्र सदरचा माध्यमिक विभाग बेकायदेशीर असल्याने महापालिकेचे तत्कालीन प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबत तेथील शिक्षकांनी अनेकवेळा प्रशासन, पदाधिकारी व नगरसेवकांकडे पाठपुरावा केला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. अखेर महापालिकेच्या सभेत मंगळवारी थेट पालकांनीच गोंधळ घालून शाळा सुरू करण्याची मागणी केली. पालक, महिला थेट सभेत घुसल्या आणि त्यांनी चक्क ठिय्या दिला. त्यामुळे महापालिका प्रशासनाची धांदल उडाली.दहावी उत्तीर्ण झालेल्या १६ विद्यार्थ्यांना त्यांचे दाखले आणि दहावीची गुणपत्रिका देण्यासही प्रशासनाने मनाई केली. त्यामुळे आपले गुण आपल्या डोळ््या पाहण्यास विद्यार्थी मुकले. तसेच त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासही अडथळे आले आहेत. यामुळेही पालक चांगलेच संतप्त झाले आहेत.बेकायदेशीर असलेल्या शाळेच्या शिक्षक, शिपाई यांना आतापर्यंत मानधन दिले जात होते. तेही मानधन प्रशासनाने रोखल्याने त्यांच्यावरही नोकरीची टांगती तलवार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे अन्य शाळात समायोजन करा, अशी मागणी पालकांची आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका