Staff Strike: Municipal employees in the city on strike the next day | कर्मचारी मारहाण : नगरमध्ये मनपा कर्मचारी दुस-या दिवशीही संपावर

कर्मचारी मारहाण : नगरमध्ये मनपा कर्मचारी दुस-या दिवशीही संपावर

अहमदनगर: कर्मचा-यांना मारहाण करणा-यांना अटक करण्याच्या मागणीसाठी महापालिा कर्मचा-यांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन दुस-या दिवशी शनिवारीही सुरूच आहे. त्यामुळे आधीच कोरोनाची भीती आहे. त्यात आता घाणीची भर पडली आहे. नागापूर गावठाण येथे महापालिका कर्मचा-यांना मारहाण करण्यात आली. मारहाण करणा-यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, कारवाई न झाल्याने महापालिका कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन केले. शुक्रवारी दिवसभर शहरात साफसफाईसह कचरा संकलनाचे काम झाले नाही. शुक्रवारी दिवसभरात संघटनेच्या पदाधिका-यांसोबत आयुक्तांनी बैठक घेतली. मात्र तोडगा निघाला नाही. त्यामुळे शनिवारी कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. त्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या प्रशासकीय कामावर तरच झालाच आहे. पण शहरातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. विविध उपाययोजना प्रशासनाकडून सुरू आहे. त्यासाठी मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. परंतु, कर्मचा-यांनीच संप पुकारल्याने नगरकरांची चिंता वाढली आहे.

Web Title: Staff Strike: Municipal employees in the city on strike the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.