शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

मढीच्या बाजारात गाढवांनी खाल्ला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 4:59 PM

दुुष्काळामुळे पाणी टंचाईचा फटका व वाहतुकीच्या साधनांचा न परवडणारा खर्च, दूरची पायपीट यामुळे मढी (ता.पाथर्डी) येथे रंगपंचमीनिमित्त दरवर्षी भरणाऱ्या बाजारात यावर्षी गाढवांची आवक घटली. मात्र तुलनेत ग्राहक वाढल्याने गाढवांच्या किंमतीत वाढ झाल्याने यंदा त्यांनी चांगलाच भाव खाल्ला.

चंद्रकांत गायकवाडतिसगाव : दुुष्काळामुळे पाणी टंचाईचा फटका व वाहतुकीच्या साधनांचा न परवडणारा खर्च, दूरची पायपीट यामुळे मढी (ता.पाथर्डी) येथे रंगपंचमीनिमित्त दरवर्षी भरणाऱ्या बाजारात यावर्षी गाढवांची आवक घटली. मात्र तुलनेत ग्राहक वाढल्याने गाढवांच्या किंमतीत वाढ झाल्याने यंदा त्यांनी चांगलाच भाव खाल्ला.मढीत पोहोचण्यापूर्वीच तिसगावचे शमा शेख यांच्या शेतवस्तीवर मुक्कामी असलेली ट्रकभर गाढवे एकाच ग्राहकाने खरेदी केली. या गाढवांना प्रत्येकी ६ ते १२ हजार रूपयांचा दर मिळाला. आमराईतील बाजारात राजस्थान येथून मुराद शहा यांनी आणलेल्या ४० गाढवांना प्रत्येकी १० ते १२ हजार रूपयांपर्यंत किंमत मिळाली. मुखेड (जि़ नांदेड) येथील श्रीरंग मामिलवार यांनीही काठेवाडी प्रकारातील १०० गाढवे विक्रीला आणली होती. शरीरकाठी, वय, प्रतवारी, रंग पाहून बाजारात त्यांचा दर ठरतो. गेल्यावर्षी काठेवाडी गाढवांना ९ ते १९ हजार रूपये किंमत होती. यंदा यात वाढ होऊन या गाढवांचा दर १२ ते २५ हजार रूपये असा वधारला आहे. यांत्रिकीकरण झाले तरी गाढवांशिवाय काही वाहतुकीची कामे होतच नाहीत, असे ते म्हणाले. पाणी टंचाईने वीटभट्ट्या बंद असल्या तरी जनावरांची खरेदी करावीच लागते, असे बेलापूरचे भाऊसाहेब नवनिघे यांनी सांगितले.गाढवांच्या खरेदी विक्रीची माहिती व उलाढालीमुळे पाच वर्षांपासून रंगपंचमी बाजारात राजस्थानी गाढवे आणतो. यावर्षी दरात तेजी आहे. गेल्यावर्षी साडेसात हजार ते अकरा हजार रूपये असलेला दर यंदा १० ते १५ हजार रूपयांपर्यंत पोहोचला आहे. हा बाजार या भूमीचे वैभव आहे. माणसांसह जनावरांना किमान पिण्याचे पाणी उपलब्ध करणे गरजेचे आहे. - मुरादभाई शहा, व्यापारीशके १०१० मध्ये रंगपंचमीच्या मुहूर्तावर चैतन्य कानिफनाथ महाराजांनी येथे संजीवन समाधी घेतल्याची आख्यायिका आहे. त्यानंतर सुमारे ३०० वर्षांनी छत्रपती शाहू महाराजांनी सरदार चिमाजी सावंत यांच्याकरवी कानिफनाथ गडाचे बांधकाम अठरापगड जातीधर्माच्या लोकांनी पूर्ण केले. त्यानुसार विविध समाजाचे मानपान सुरू आहेत. गाढवांचा बाजार आरंभही त्याच कालखंडात आहे. गाढवे हेच त्यावेळी एकमेव वाहतुकीचे साधन होते. रंगपंचमीस १००९ वर्षांची, तर गाढवांच्या बाजारास ७५० वर्षांची परंपरा आहे. मधुकर साळवे, विश्वस्त, श्रीक्षेत्र मढी देवस्थान.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर