श्रीगोंद्यात कुकडीच्या पाण्यासाठी आंदोलन करणा-या सामाजिक कार्यकर्त्यांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 01:01 PM2021-04-15T13:01:54+5:302021-04-15T13:02:35+5:30

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : कुकडी पाणी प्रश्नावर कुकडी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर,  माजी जिल्हा परिषद सदस्य दिकर पंधरकर, प्रमोद जगताप, सुरेश भापकर या चौघांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक  केली आहे 

Social activists arrested for water supply in Shrigonda | श्रीगोंद्यात कुकडीच्या पाण्यासाठी आंदोलन करणा-या सामाजिक कार्यकर्त्यांना अटक 

श्रीगोंद्यात कुकडीच्या पाण्यासाठी आंदोलन करणा-या सामाजिक कार्यकर्त्यांना अटक 

Next

 

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : कुकडी पाणी प्रश्नावर कुकडी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर,  माजी जिल्हा परिषद सदस्य दिकर पंधरकर, प्रमोद जगताप, सुरेश भापकर या चौघांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक  केली आहे 


कोरोना पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी, संचारबंदीचे आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्या प्रकरणी चौघा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारुती भापकर यांनी कुकडीच्या पाणी प्रश्नावर सुरु केलेल्या आंदोलनास  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी,  विदर्भातील शेतकरी संघटनेचे नेते विजयराव जावंधिया , प्रकाश पोहरे, सामाजिक कार्यकर्त्यां मेधाताई पाटकर,   सेवानिवृत्त आयपीएस सुरेश खोपडे यांनी  मपाठिंबा दिला आहे. आंदोलकांवर केलेल्या कारवाईचा राज्यभर निषेध होणार आहे.

  मारुती भापकर म्हणाले की, डिंबे माणिकडोह जोड बोगद्याचे काम आणि कुकडी चे आवर्तन 25 एप्रिलला सोडावे या मागणीसाठी धरणे आंदोलन केले आंदोलन करताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केलेले नाही. शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसांनी अटक केली. पण आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार आहे.


पोलिस निरीक्षक रामराव ढिकले म्हणाले, जिल्हाधिकारी यांचे कोरोना पार्श्भूमीवर  संचारबंदी,जमावबंदीचे आदेश आहेत. आंदोलकांनी आंदोलन करून आदेशाचा भंग करु नये,  अशी नोटीस दिली होती. पण त्यांनी ऐकले नाही म्हणून ना विलाजाने कारवाई करणे पोलिसांनी भाग पडले.

Web Title: Social activists arrested for water supply in Shrigonda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.