शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू, संगमनेर तालुक्यातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2022 4:17 PM

अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. व्ही. भुतांबरे हे करीत आहेत तर बहीण- भावाच्या मृत्यूने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

अहमदनगर - शेततळ्यातील पाण्यात भावाचा पाय घसरून तो बुडत असताना, मदतीसाठी धावलेल्या बहिणीचाही बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि. ८)सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा अंतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे घडली. जयश्री बबन शिंदे (वय २१),आयुष बबन शिंदे (वय ७), असे मृत्यू झालेल्या बहीण-भावाची नावे आहेत.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. रविवारी सकाळच्या सुमारास, मुलगी जयश्री आणि मुलगा आयुष हे दोघे बहीण-भाऊ धुणे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. आयुष हा शेततळ्याच्या कडेला खेळत असताना त्याचा पाय घसरून तो शेततळ्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी बहीण जयश्री हिने शेततळ्यात उडी मारली मात्र दोघेही पाण्यात बुडाले.              जयश्री व आयुष हे दोघे बहीण - भाऊ शेततळ्यात बुडाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रूग्णालयात नेण्यात आले. धीरज शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. व्ही. भुतांबरे हे करीत आहेत तर बहीण- भावाच्या मृत्यूने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेFarmerशेतकरी