रुग्णांच्या मदतीला श्रीरामपूर कोविड केअर टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:18 AM2021-05-01T04:18:45+5:302021-05-01T04:18:45+5:30

‘श्रीरामपूर कोविड केअर टीम’ हा हेल्पलाईन ग्रुप त्यांनी तयार केला आहे. रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे कामही हे ...

Shrirampur Covid Care Team to help patients | रुग्णांच्या मदतीला श्रीरामपूर कोविड केअर टीम

रुग्णांच्या मदतीला श्रीरामपूर कोविड केअर टीम

Next

‘श्रीरामपूर कोविड केअर टीम’ हा हेल्पलाईन ग्रुप त्यांनी तयार केला आहे. रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे कामही हे तरुण करतात. या सेवाकार्यामुळे तरुण शहरात चर्चेत आले आहेत. आजपर्यंत शहरातील शेकडो रुग्णांना त्यांनी सेवा दिली आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे सामान्यांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. खासगी रुग्णालयातील महागडे उपचार त्यांना मिळत नाही. अनेक रुग्ण उपचाराविना दगावतात. त्यामुळे सामाजिक भान असलेले ॲड. समीन बागवान, कॉ. जीवन सुरुडे, शरीफ शेख, नईम शेख, जावेद पठाण, रवींद्र त्रिभुवन, महेबूब शेख, अकबर पठाण, फयाज इनामदार, चंदू मोरे, मुद्दसर शेख, श्रीकृष्ण बडाख हे तरुण एकत्र आले.

गरीब रुग्णांसाठी काय करता येऊ शकते, यावर त्यांनी चर्चा केली. त्यानंतर ‘श्रीरामपूर कोविड केअर टीम’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत शहरातील शेकडो रुग्णांना त्यांनी मदतही केली आहे.

-------

काय करते टीम?

काही रुग्ण प्राथमिक लक्षणे असूनही कोरोना चाचणी करण्यास घाबरतात. अशा रुग्णांना धीर देत त्यांना तापसणीसाठी तयार करण्याचे काम टीमचे सदस्य करतात. सकारात्मक चाचणी आल्यानंतर रुग्णांना उपचारासाठी संपर्क साधून बेड उपलब्ध करून दिले जातात. रुग्णालयातील व्यवस्थापनाशी संपर्क करून गरिबांना सवलतीच्या दरात उपचार सुविधा पुरवणे. रेमडेसिविर, ऑक्सिजन मिळवून देणे यासाठी अनेकदा जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना ते संपर्क साधतात. आमदार, मुख्याधिकारी, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष ते नगरसेवक यांच्या मदतीने अडचणींवर मात करण्यासाठी हे तरुण धडपडत आहेत.

------

आर्थिक मदत

अनेकदा कुटुंबातील सर्वच्या सर्व सदस्य कोरोनाबाधित होतात. अशा कुटुंबांना जेवणाचे डबे, औषधोपचार व इतर बाबींसाठी आर्थिक मदत मिळवून देण्याचे मोठे काम टीम करत आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींची मदत घेतली जात आहे.

--------

सदस्य झाले संक्रमित

‘श्रीरामपूर कोविड केअर टीम’ मधील जीवन सुरुडे दिवस-रात्र रुग्णांच्या संपर्कात येतात. त्यामुळे ते स्वतः बाधित झाले. उपचार सुरू असताना विलगीकरण कक्षातूनही त्यांनी गरजूंना मदत मिळवून दिली.

--------------

Web Title: Shrirampur Covid Care Team to help patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.