श्रीगोंदा मतदारसंघ निवडणूक निकाल : भाजपचे बबनराव पाचपुते विजयी; चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शेलार पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 18:01 IST2019-10-24T18:00:20+5:302019-10-24T18:01:06+5:30
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते यांनी चुरशीच्या निवडणुकीत विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घनशाम शेलार यांच्यावर ४ हजार ७४० मतांनी विजय मिळविला.

श्रीगोंदा मतदारसंघ निवडणूक निकाल : भाजपचे बबनराव पाचपुते विजयी; चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शेलार पराभूत
श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते यांनी चुरशीच्या निवडणुकीत विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घनशाम शेलार यांच्यावर ४ हजार ७४० मतांनी विजय मिळविला.
गुरूवारी सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रत्येक फेरीत पाचपुते-शेलार यांच्या मतांची आघाडी कमी जास्त होत होती. मागील वेळेस पाचपुते यांचा राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी पराभव केला होता. परंतु यावेळी जगताप यांनी कुकडी कारखान्याच्या व शेतकºयांच्या हितासाठी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. यामुळे राष्ट्रवादीने घनशाम शेलार यांना उमेदवारी दिली. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश करुन पाचपुते यांना बळ दिले. दरम्यान शेलार यांच्या बाजूने आमदार राहुल जगताप यांनी आपली ताकद उभी केली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार यांनीही शेलार यांना ताकद दिली होती. परंतु पाचपुते यांचा गेल्या पाच वर्षातील जनतेशी संपर्क होता. पाणी प्रश्न, दुष्काळाचे प्रश निवडणुकीत महत्वाचे ठरले. परंतु भाजपचे सरकार सत्तेत असल्याने याचा फायदा पाचपुते यांना झाला. मतदारांनीही पाचपुते यांना यामुळे कौल दिला. पाचपुते यांनी श्रीगोंदा मतदारसंघातून अनेक वेळा प्रतिनिधीत्व केले आहे.