भंडारदरा,मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 07:04 PM2020-08-13T19:04:14+5:302020-08-13T19:07:53+5:30

राजूर:भंडारदरा,मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पावसाच्या सरी कोसळत आहेत.यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी दिवसभराच्या बारा तासांत भंडारदरा येथे तब्बल ९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आणि धरणात 357 दशलक्ष घनफुट नवीन पाण्याची आवक होत पाणीसाठा सुमारे 78 टक्के झाला. धरण परिसरात असाच पाऊस कोसळत राहिल्यास तीन दिवसांत भंडारदरा धरण भरण्याची शक्यता आहे.दरम्यान भंडारदरा धरणातून वीज निर्मिती साठी ८३५ कुसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

Showers in Bhandardara, Mula dam catchment area | भंडारदरा,मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पावसाच्या सरी

भंडारदरा,मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पावसाच्या सरी

googlenewsNext

 

राजूर : भंडारदरा,मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पावसाच्या सरी कोसळत आहेत.यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी दिवसभराच्या बारा तासांत भंडारदरा येथे तब्बल ९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आणि धरणात 357 दशलक्ष घनफुट नवीन पाण्याची आवक होत पाणीसाठा सुमारे 78 टक्के झाला. धरण परिसरात असाच पाऊस कोसळत राहिल्यास तीन दिवसांत भंडारदरा धरण भरण्याची शक्यता आहे.दरम्यान भंडारदरा धरणातून वीज निर्मिती साठी ८३५ कुसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.


    बुधवारी रात्री पासून पाणलोट क्षेत्रास साजेसा पावसास सुरुवात झाली. गुरुवारी  सकाळी संपलेल्या चोवीस तासांत घाटघर येथे साडे सहा इंचाहून अधिक तर रतनवाडी,पांजरे भंडारदरा येथे सुमारे पाच इंच पावसाची नोंद झाली.
 

मागील आठवड्या पासून मुळा,भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची सतत धार सुरूच होती. असे असतानाच बुधवारी रात्रभर परिसरात जोरदार पावसाच्या सरी बरसू लागल्या.गुरुवारी सकाळ पासून मुसळधार सरी बरसत आहेत.यामुळे परिसरातील ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले असून धरणांतील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.


    गुरुवारी भंडारदरा परिसरात दिवसभर धो धो पाऊस कोसळत होता. दिवसभराच्या बारा तासांत येथे ९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.धरणात संपलेल्या गुरुवारी सायंकाळी सहा वाजता संपलेल्या ३६ तासांत चोवीस तासांत ८७६ दशलक्ष घनफुट नविन पाण्याची आवक होत पाणीसाठा ८ हजार ५८७ दशलक्ष घनफुटा पर्यंत पोहचला होता.
       दरम्यान कळसुबाई शिखराच्या पर्वत रांगांतही पावसाचा जोर कायम आहे.त्यातच निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाकी येथे ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.वाकी येथील लघु पाटबंधारे तलावा वरून पाणी प्रवरेची उपनदी समजल्या जाणाऱ्या कृष्णावंती नदीपात्रात १हजार२२ कुसेक्सने पाणी झेपावत असल्याने निळवंडे धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.निळवंडे धरणातील पाणीसाठा गुरुवारी सकाळी सहा वाजता ५ हजार १४ दशलक्ष घनफुट झाला होता.


       गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस मिलिमीटर मध्ये पुढील प्रमाणे ,कंसात या मोसमात नोंदला गेलेला पाऊस.घाटघर १६५(३१२८), रतनवाडी १५५(२३६०) ,पांजरे १४५(२०१४) तर भंडारदरा येथे १४० (१७२२)मिलिमीटर पावसाची नोंद झाली.


 हरिश्चंद्र गडाच्या परिसरातील पर्वत रांगांत जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने कोतुळ जवळील मुळेच्या विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.यामुळे या मोसमात पहिल्यांदा मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे.गुरुवारी सकाळी हा विसर्ग १४ हजार कुसेक्सहून अधिक म्हणजेच १४ हजार ३२२कुसेक्स इतका होता. यामुळे मुळा धरणातही नवीन पाण्याची आवक वाढली आहे.

Web Title: Showers in Bhandardara, Mula dam catchment area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.