संगमनेर तालुक्यात शिवशाही बसने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 04:23 PM2020-03-12T16:23:55+5:302020-03-12T16:24:04+5:30

संगमनेर / घारगाव :महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस आणि दुर्घटना हे जणू समीकरणच बनले आहे. नाशिक पुणे महामार्गावर चंदनापूरी घाटानजीक आनंदवाडी शिवारात याची प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली.नाशिकहून शिवशाही बस  पुण्याकडे जात होती. सकाळी आठ वाजता संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी परिसरात महामार्गावर या गाडीने पेट घेतला. यामध्ये २२ प्रवासी होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत बस पूर्णपणे जाळून खाक झाली.

 Shivshahi bus took pat in Sangamner taluka | संगमनेर तालुक्यात शिवशाही बसने घेतला पेट

संगमनेर तालुक्यात शिवशाही बसने घेतला पेट

Next

संगमनेर / घारगाव :महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस आणि दुर्घटना हे जणू समीकरणच बनले आहे. नाशिक पुणे महामार्गावर चंदनापूरी घाटानजीक आनंदवाडी शिवारात याची प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली.नाशिकहून शिवशाही बस  पुण्याकडे जात होती. सकाळी आठ वाजता संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी परिसरात महामार्गावर या गाडीने पेट घेतला. यामध्ये २२ प्रवासी होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत बस पूर्णपणे जाळून खाक झाली.

   याबाबत सविस्तर माहिती अशी की,  गुरुवारी सकाळी नाशिक वरुन ही बस पुण्याला जात होती. संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी घाटानजीक आनंदवाडी शिवारात बस आल्यावर बसच्या इंजिन मधून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. बस चालक बट्टू अर्जुन अहिरे यांनी तात्काळ बस रस्त्याच्या कडेला घेतली.बसमधील 22 प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या.परिसरातील नागरिकांना घटना निदर्शनास येताच तात्काळ 
अग्निशामक केंद्राशी संपर्क साधला.अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या घटनास्थळी येऊन काही मिनिटात आगीवर नियंत्रण आणले.घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलीस,घारगाव व संगमनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.वाहतूक सुरळीत करण्यात आली.
        दरम्यान, शिवशाही बसमध्ये २२ प्रवासी होते. चालकाच्या आग लागल्याचे लक्षात आल्याने, मोठा अनर्थ टळला.

Web Title:  Shivshahi bus took pat in Sangamner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.