तरुणीच्या मृत्यूप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा : शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 06:07 PM2019-06-14T18:07:47+5:302019-06-14T18:08:05+5:30

महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांच्या गलथानपणामुळे पोलीस मुख्यालयात विजेच्या धक्क्याने तरुणीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी संबंधित अधिकारी कर्मचा-यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा,

Shiv Sena's demand for filing a human rights complaint against the girl's death: | तरुणीच्या मृत्यूप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा : शिवसेनेची मागणी

तरुणीच्या मृत्यूप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा : शिवसेनेची मागणी

Next

अहमदनगर : महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांच्या गलथानपणामुळे पोलीस मुख्यालयात विजेच्या धक्क्याने तरुणीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी संबंधित अधिकारी कर्मचा-यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, तसेच मयत तरुणीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिका-यांकडे केली आहे.
शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, गिरीश जाधव, संभाजी कदम, संजय शेंडगे, संतोष गेनाप्पा, महेंद्र बिज्जा, सचिन शिंदे, सुरेश तिवारी,अमोल येवले, सुहास पाथरकर, अर्जुन बोरुडे, मंगलताई लोखंडे यांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता यांची भेट घेवून निवेदन दिले.
नगर शहरामध्ये पाऊस आणि वादळ याला सुरवात झाली आहे. आज नगर शहरात अशी परिस्थिती आहे कि नगर शहरात अनेक भागात वीजपुरवठा तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, वृद्ध लोकांचे अतोनात हाल होत आहेत. वीज बंद झाल्यावर वीज केव्हा येईल याची उत्तरे जनतेला मिळत नाहीत. मोबाईल किंवा फोन उचलत नाहीत व बंद करून निघून जातात. महावितरणची आपतकालीन व्यवस्था सुरु केली का नाही याची माहिती व फोन नंबर जनतेला मिळावे आणि आपतकालीन व्यवस्था १५ मिनिटात हजर रहावी. गुरुवारी(दि. १३) पोलीस मुख्यालयात विजेच्या धक्क्याने तरुणीच्या मृत्यूची दुदैर्वी घटना घडली होती याला जबाबदार महावितरण आहे. अनेक वेळेस तक्रार करूनसुध्दा ती दुरुस्ती न केल्यामुळे त्या मुलीचा मृत्यूझाला आहे. याला जबाबदार कोणते अधिकारी आहेत त्यांना तातडीने निलंबित करून त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

Web Title: Shiv Sena's demand for filing a human rights complaint against the girl's death:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.