अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर शशिकांत नजान यांची फेरनियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 07:27 PM2019-09-02T19:27:32+5:302019-09-02T19:32:19+5:30

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयकपदी आणि भरारी पथकाच्या जिल्हा प्रमुख पदावर शशिकांत नजान यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते नजान यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

Shashikant Najan has been re-appointed to the All India Marathi Film Corporation | अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर शशिकांत नजान यांची फेरनियुक्ती

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर शशिकांत नजान यांची फेरनियुक्ती

Next

अहमदनगर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयकपदी आणि भरारी पथकाच्या जिल्हा प्रमुख पदावर शशिकांत नजान यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते नजान यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्व आघाडीचे अहमदनगर जिल्हा प्रमुख म्हणून नजान काम पाहणार आहेत. शहर आणि तालुकास्तरावरील सभासदांच्या नियुक्त्या लवकरच करण्यात येणार असल्याचे राजेभोसले यांनी सांगितले. यावेळी अभिनेते सुशांत शेलार, संजय ठुबे, अनिल गुंजाळ, विनय जवळगीकर, नितिन लचके उपस्थित होते.
राजेभोसले म्हणाले, शशिकांत नजान यांनी याच पदावर कार्यरत असताना चित्रपट महामंडळाचे सुमारे ६५० पेक्षा जास्त सभासद वाढविले आहेत. चित्रपटांच्या नावाखाली फसव्या ऑडिशन, कलाकारांची आर्थिक फसवणूक या विरोधी नजान यांनी प्रभावी कार्य करीत चित्रपट महामंंडळाच्या माध्यमातून कलाकारांना न्याय मिळवून दिला. अनेक कलाकार, तंत्रज्ञ यांचे रखडलेले मानधन मिळवून दिले. तोतया आणि फसव्या दिग्दर्शक, निर्मात्यांकडून कलाकारांची आर्थिक, मानसिक त्रासातून सोडवणूक केली. यासह अभिनयाचे मोफत प्रशिक्षण, नव्याने प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना प्रदर्शनासाठी सहकार्य, लघुपट, मालिका, चित्रपटांच्या चित्रीकरणांनाही सहकार्य केले. त्यामुळे त्यांना पुन्हा महामंडळावर संधी दिल्याचे ते म्हणाले.

Web Title: Shashikant Najan has been re-appointed to the All India Marathi Film Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.