वाचन संस्कृतीचा वाटाडया; ग्रंथमित्र मुरलीधर नवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:39 PM2019-10-15T13:39:46+5:302019-10-15T13:42:12+5:30

४० वर्षापूर्वी राहुरी येथील सामान्य कुटुंबातील मुरलीधर नवाळे यांनी ग्रंथपाल म्हणून राहुरी नगर परिषदेच्या स्वामी विवेकानंद वाचनालयात वाचन संस्कृती वाढविण्याचा श्रीगणेशा केला़. नवाळे यांनी अहमदनगर जिल्हयातील विशेषत: ग्रामीण भागात १५० ग्रंथालय सुरू करण्याची प्रेरणा दिली़. त्यातून लाखो वाचकांचा वाटाडया होण्याची संधी मिळाली़ वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी खास संवाद साधला. 

Share the culture of reading; Bookwriter Muralidhar Naval | वाचन संस्कृतीचा वाटाडया; ग्रंथमित्र मुरलीधर नवाळे

वाचन संस्कृतीचा वाटाडया; ग्रंथमित्र मुरलीधर नवाळे

Next

वाचन प्रेरणा दिन विशेष / भाऊसाहेब येवले  
राहुरी : शिक्षणाअभावी समाजामध्ये वाचकांची संख्या दुर्मिळ होती़ ठराविक व्यक्ती वृत्तपत्र व कथा कादंब-या वाचायचे. अशा अंगठेबहाद्दर परिस्थितीत ४० वर्षापूर्वी राहुरी येथील सामान्य कुटुंबातील मुरलीधर नवाळे यांनी ग्रंथपाल म्हणून राहुरी नगर परिषदेच्या स्वामी विवेकानंद वाचनालयात वाचन संस्कृती वाढविण्याचा श्रीगणेशा केला़. नवाळे यांनी अहमदनगर जिल्हयातील विशेषत: ग्रामीण भागात १५० ग्रंथालय सुरू करण्याची प्रेरणा दिली़. त्यातून लाखो वाचकांचा वाटाडया होण्याची संधी मिळाली़ वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी खास संवाद साधला. 
ग्रंथपाल म्हणून नोकरीची सुरवात कधी केली?
मुरलीधर नवाळे : जुनी अकरावी परीक्षा दिल्यानंतर वाचनालयात ग्रंथपाल म्हणून नोकरीला सुरूवात केली़. त्यावेळी नगर परिषदेत १८०० पुस्तके होती़. वाचनालयाचा दर्जा ‘ड’ होता़ वाचनालयात पुस्तकांची संख्या २७ हजारावर नेऊन वाचनालयास तालुका ‘अ’ वर्ग प्राप्त करून दिला़. तत्कालीन नगराध्यक्ष ल़. रा़. बिहाणी यांच्यामुळे ग्रंथपाल म्हणून काम करण्याची प्रभावी संधी मिळाली़.
ग्रंथ चळवळ वाढविण्यासाठी काय परिश्रम केले?
मुरलीधर नवाळे : जिल्हाभर वाचक चळवळ वाढावी म्हणून महाराष्ट्र शासनाचा ग्रंथालय संचानालय ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग राहुरी येथे २० वर्ष घेतला़ त्यातून हजारो विद्यार्थी पुढे ग्रंथपाल म्हणून उदयास आले़. ग्रंथालय स्थापन करण्यासाठी गावोगावी जाऊन ग्रंथपालांना मार्गदर्शन केले़. शासन दरबारी प्रयत्न करून मान्यता मिळवून दिली़. त्यामुळे वाचन संस्कृती गावोगावी उभी रहाण्यास मदत झाली़. धर्मदाय आयुक्तांकडे संस्था स्थापण्यासाठी पाठपुरावा केला़. त्यामुळे १५० ग्रंथालयांना शासकीय मान्यता मिळाली. तसेच त्यांना अनुदान मिळाले़
उत्कृष्ट कामाचे काही बक्षीस?
मुरलीधर नवाळे : दरवर्षी होणाºया जिल्हा, विभागीय व राज्य पातळीवर होणा-या ग्रंथालय आधिवेशनामध्ये सक्रीय सहभाग घेतो. वाचन संस्कृती वाढावी म्हणून ग्रंथपालांना वेतनवाढ, वाचनालय अनुदानात वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न केले़. वाचन संस्कृतीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबददल एस़. आऱ. रंगनाथन यांच्या नावाने दिला जाणारा शासनाचा उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार प्राप्त झाला़. 

ग्रंथपालांचे प्रश्न काय आहेत?
मुरलीधर नवाळे : शासकीय उदासीनतेमुळे ग्रंथालयांना मान्यता मिळत नाही़ दर्जा बदल होत नाही़. त्यामुळे ग्रंथपालांच्या वेतनात वाढ होत नाही़. कमी पगारावर चांगले ग्रंथपाल उपलब्ध होत नाही़. शासनाने अनुदानात भरीव वाढ मिळावी म्हणून संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत़. आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाचन संस्कृती लुप्त पावत आहे़. शासन एकीकडे ए़. पी़. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन पे्ररणा दिन म्हणून साजरी करीत असते़. मात्र दुस-या बाजुला ग्रथालयांना शासकीय छायाछत्र व लोकसहभाग पुरेसा मिळत नाही. अधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अमेरिकासारखया देशात वाचनालयांना प्रोत्सहन दिले जात आहे़. त्याच पध्दतीने देशात व राज्यात वाचनालयांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.

Web Title: Share the culture of reading; Bookwriter Muralidhar Naval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.