शरद पवार यांनी पाहिले निलेश लंके यांचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 01:56 PM2021-10-02T13:56:32+5:302021-10-02T13:56:39+5:30

अहमदनगर : पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे साधे राहणीमान आणि साधे घर नेहमीच चर्चेत राहिले आहे. आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार हेही लंके यांच्या हंगा येथील घरी आले. यावेळी आमदार लंके यांच्या आई-वडिलांची पवार यांनी आस्थेने चौकशी केली.

Sharad Pawar saw Nilesh Lanka's house | शरद पवार यांनी पाहिले निलेश लंके यांचे घर

शरद पवार यांनी पाहिले निलेश लंके यांचे घर

Next

अहमदनगर : पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे साधे राहणीमान आणि साधे घर नेहमीच चर्चेत राहिले आहे. आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार हेही लंके यांच्या हंगा येथील घरी आले. यावेळी आमदार लंके यांच्या आई-वडिलांची पवार यांनी आस्थेने चौकशी केली.

राष्ट्रीय महामार्गांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमानंतर शरद पवार हे अचानक आमदार लंके यांच्या घरी गेले. यावेळी कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी होती. यावेळी आमदार लंके यांनी पुष्पगुच्छ देऊन पवार यांचे स्वागत केले.

आमदार लंके यांनी कोरोना काळात केलेले काम देशपातळीवर चर्चेत आले होते. तसेच लंके यांचा साधेपणा, त्यांचे साधे घर यावर नंतर चर्चा झाली. आज पवार यांनी आज थेट लंके यांच्या घरी भेट दिली. त्यामुळे कार्यकर्तेही भारावले. अत्यंत साध्या घरात पवार हे गेल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदालाही उधाण आले होते. पवार यांच्या बाजुला आमदार लंके यांचे आई-वडिल होते. त्यांचीही पवार यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.  यावेळी लंके यांच्या मुलीनेही शरद पवार यांच्याशी संवाद साधला. यावेळी पवार यांनीही लंके यांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणाबाबत विचारले. 

Web Title: Sharad Pawar saw Nilesh Lanka's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app