पाणीप्रश्न आपण सोडवू-शरद पवार; आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कोपरगावात सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:56 PM2019-10-15T12:56:13+5:302019-10-15T12:56:38+5:30

कोपरगावची पाण्याची समस्या फार मोठी आहे. शासनाने याकडे कायम दुर्लक्ष केले. मात्र तुमचा पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर मी स्वत: यात लक्ष घालून मदत करील. त्यासाठी  तुम्ही सर्वप्रथम कोपरगावात परिवर्तन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

Sharad Pawar; Meeting in Kotargaon for the campaign of Ashutosh Kale | पाणीप्रश्न आपण सोडवू-शरद पवार; आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कोपरगावात सभा

पाणीप्रश्न आपण सोडवू-शरद पवार; आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कोपरगावात सभा

Next

कोपरगाव : कोपरगावची पाण्याची समस्या फार मोठी आहे. शासनाने याकडे कायम दुर्लक्ष केले. मात्र तुमचा पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर मी स्वत: यात लक्ष घालून मदत करील. त्यासाठी  तुम्ही सर्वप्रथम कोपरगावात परिवर्तन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
सोमवारी कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. सभेचे अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते. व्यासपीठावर उमेदवार आशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, संजीव भोर, चैताली काळे, स्नेहल शिंदे, स्वप्नजा वाबळे, पदमकांत कुदळे, डॉ.अजय गर्जे, माजी नगराध्यक्ष  मंगेश पाटील, सुनील गंगूले, सलीम पठाण, मेहमूद सैय्यद, रमेश गवळी, सुनील बोरा, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संभाजी काळे, माधव खिलारी, अशोक खांबेकर उपस्थित होते. कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, अजय गर्जे, संतोष डागा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 
पवार म्हणाले, आशुतोषची निवडणूक पाहिली तेव्हा मला माझी निवडणूक आठवली. आशुतोष आमदार व्हावा, ह्या इच्छेपेक्षा महाराष्ट्रात भविष्यात तयार होणारी तरुण कर्तबगार पिढीमध्ये सर्वात वरच्या स्थानावर आशुतोष असावा. ७१  हजार कोटी रुपये शेतकºयांना कर्जमाफी देण्याचे काम आम्ही केले आणि सर्व शेतकºयांचा उतारा कोरा केला. शेतकºयांना कर्ज दिले, वेळेत कर्ज फेडणाºयांना शून्य टक्के  व्याजदर ठेवला होता. एकावर्षात कर्जमाफी करणारे त्यांना सत्ता देऊन पाच वर्षे झाले मात्र आजपर्यंत पूर्ण कर्जमाफी दिली नाही.  औद्योगिक वसाहती काढून शेतकºयांच्या मुलांना नोकºया उपलब्ध करून दिल्या तसेच सहकार जिवंत ठेवल्याचेही पवार म्हणाले.
आशुतोष काळे म्हणाले,  शेतकरी संप मोडीत काढला. आमदार निष्क्रिय आहेत. नगर जिल्ह्यात कर्जत जामखेडसह कोपरगाव निवडून देणार आहे. लाटेवर येणाºया 
लोकप्रतिनिधी आहे. आमदारकी माझी हौस नाही, जे काही करायचे आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी करायचं आहे.
 

Web Title: Sharad Pawar; Meeting in Kotargaon for the campaign of Ashutosh Kale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.