Set aside the Venus in the ‘Agastya’ | ‘अगस्ती’तील झारीतील शुक्राचार्य बाजूला करा

‘अगस्ती’तील झारीतील शुक्राचार्य बाजूला करा

पवार यांनी माजीमंत्री मधुकर पिचड यांचे नाव न घेता टीका केली. सभासदांनी साथ दिली तर अगस्ती कारखाना आर्थिक स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण रस्ता सांगू ! पण तो नीट चालवला पाहिजे. कोणतीही उधळपट्टी नको, असा सल्ला द्यायला ते विसरले नाहीत. शेंडी - भंडारदरा येथे शरद पवार यांच्या हस्ते लोकनेते आमदार यशवंतराव भांगरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. ते पुढे म्हणाले, पक्ष सोडून जाणारे अनेक पाहिले, पण डगमगलो नाही. १९८०ला ५६पैकी ५० आमदार मला सोडून गेले होते. त्याच्या पुढच्या निवडणुकीत सोडून गेलेले ४८ आमदार पराभूत झाले. ही किमया जनता घडवते. अकोलेतील जनतेने हे दाखवून दिले आहे. भांगरे कुटुंबाने सामंजस्याची भूमिका घेतल्याने परिवर्तन झाले. असेच सामंजस्य टिकवून ठेवा. विकासकामांसाठी बांधिलकी ठेवून काम करा. गोळ्यामेळ्याने राहा. तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

नगर जिल्हा पाटपाणी प्रश्नाबाबत प्रचंड जागरूक आहे. अकोले तालुक्यातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी माझे विधानसभेतील ज्येष्ठ सहकारी दिवंगत माजी आमदार यशवंतराव भांगरे यांचे योगदान विसरता येणार नाही. विकास योजना होताना स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे. मी नववीत असताना लोणी, प्रवरानगरहून सायकलवर भंडारदरा पाहायला तर १९९२ला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलो होतो. या आठवणीना पवार यांनी उजाळा दिला.

याप्रसंगी मंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, आमदार डॉ. किरण लहामटे, दिवंगत आमदार यशवंतराव यांच्या पत्नी अंजनाबाई यशवंतराव भांगरे, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, दशरथ सावंत, जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे, सरपंच दिलीप भांगरे, अमित भांगरे, आमदार माणिक कोकाटे, राजेंद्र फाळके, संघराज रुपवते, अविनाश आदिक, संदीप वर्पे, रमेशचंद्र खांडगे, गोटीराम पवार, भानुदास तिकांडे, बी. जे. देशमुख, अरुण कडू, रावसाहेब म्हस्के, शारदा लगड, स्वाती शेणकर, विनय सावंत, दिलीप शिंदे, कपिल पवार, अजय फटांगरे, भास्कर कानवडे उपस्थित होते. विनोद हांडे यांनी प्रास्ताविक केले. सरपंच दिलीप भांगरे यांनी आभार मानले.

...

अकोलेत पर्यटनाचा विकास करू

गेले वर्षभर कोरोनामुळे विकासकामावर परिणाम झाला. अकोले तालुक्याच्या पर्यटन विकासकामासाठी आमदार किरण लहामटे व अशोक भांगरे यांच्या पाठिशी हिमालयासारखा उभा राहीन. अकोले तालुक्याची पर्यटनासाठी देशात ओळख होईल, असे काम करून दाखवू, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

...

फोटो-२४अकोले शरद पवार

...

Web Title: Set aside the Venus in the ‘Agastya’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.