शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

पाथर्डीकरांनी दुस-यांदा राजळेंना तारले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 4:09 PM

अत्यंत चुरशीच्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या मोनिका राजळे यांना सलग दुस-यांदा मतदारांनी कौल देत विधानसभेत पाठविले आहे़. राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांना शेवगाव तालुक्यात आघाडी मिळाली होती़. मात्र, ही आघाडी मोडून काढीत पाथर्डीकरांनी राजळेंच्या विजयावर शिक्कामोर्तब केले़. राजळेंच्या विजयामुळे मतदारांनी जातीय समीकरणेही ठोकरल्याचे दिसत आहे़.

शेवगाव विधानसभा विश्लेषण-उमेश कुलकर्णी / अनिल साठे । पाथर्डी : अत्यंत चुरशीच्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या मोनिका राजळे यांना सलग दुस-यांदा मतदारांनी कौल देत विधानसभेत पाठविले आहे़. राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांना शेवगाव तालुक्यात आघाडी मिळाली होती़. मात्र, ही आघाडी मोडून काढीत पाथर्डीकरांनी राजळेंच्या विजयावर शिक्कामोर्तब केले़. राजळेंच्या विजयामुळे मतदारांनी जातीय समीकरणेही ठोकरल्याचे दिसत आहे़.मतदारसंघात केलेली विकास कामे, मतदारांशी असलेला थेट संपर्क आणि पाथर्डीकरांनी दिलेली निर्णायक साथ राजळेंच्या विजयाची त्रिसूत्री मानली जाते़. ढाकणे यांना माजी आमदार घुले बंधूंची साथ मिळाली असली तरी त्यांना पाथर्डी तालुक्यातूनच म्हणावी तितकी साथ मिळाली नाही़. शेवगावमधून मिळालेली आघाडी त्यांना पाथर्डी तालुक्यात टिकविता आली नाही़. त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शेवगाव तहसील कार्यालयात घेण्यात आली.  गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. पहिल्या अकरा फेरीत राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांना आघाडी होती. परंतु अकराव्या फेरीनंतर राजळे यांनी आघाडी घेतली़ ती आघाडी शेवटपर्यंत टिकून राहिली़. त्यांनी १४ हजार २९४ मतांनी विजय संपादन केला. ढाकणे यांच्याविषयी काही प्रमाणात सहानुभूती निर्माण झाल्याचे बोलले जात होते़. परंतु ढाकणेंना मिळालेली सहानुभूती मतांमध्ये परावर्तित झालेली निकालातून दिसत नाही़. बोधेगाव येथे ढाकणेंचा केदारेश्वर सहकारी साखर कारखाना आहे़. परंतु त्या भागातही ढाकणेंना अपेक्षित मुसंडी मारता आली नाही़. तसेच पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागातही ढाकणेंना आघाडी घेता न आल्याने त्यांचा पराभव झाल्याचे दिसत आहे. राजळे यांच्यासाठी पंकजा मुंडे यांची झालेली सभा फायद्याची ठरली़. राजळे यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज होती़. त्या तुलनेत ढाकणे यांच्याकडे कार्यकर्ते फारच कमी होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोधेगावात तर खासदार अमोल कोल्हे यांनी पाथर्डी येथे ढाकणे यांच्यासाठी सभा घेतली. या सभांमुळे ढाकणे यांच्या मतांमध्ये मोठी वाढ झाली़. मागील निवडणुकीत राजळे यांना ५३ हजारांचे मताधिक्य होते़. मात्र, राष्ट्रवादीच्या झुंजार प्रचाराने राजळेंच्या मताधिक्याचा वारु १४ हजारावर रोखला़. मतमोजणीत राजळे सुरुवातीला पिछाडीवर असल्याने त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. मात्र पाथर्डीने त्यांना तारले. ढाकणे, राजळेंचे संपूर्ण कुटुंब होते प्रचारातमोनिका राजळे यांच्या प्रचारात पक्षाचे जुने कार्यकर्ते फारसे सहभागी झाले नव्हते. राजळे यांच्या प्रचारात त्यांचा मुलगा कृष्णा, दीर राहुल राजळे , जाऊबाई मोनाली राजळे सहभागी झाले होते.राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या प्रचारात ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे, प्रताप ढाकणे यांच्या सौभाग्यवती प्रभावती ढाकणे, मुलगा ऋषिकेश ढाकणे सहभागी झाले होते़. राजळेंनी गुलाल घेतलाच नाहीपरळी येथील निवडणुकीत पंकजा मुंडे पराभूत झाल्याने मोनिका राजळे यांनी स्वत:च्या विजयानंतर विजयाचा आनंद साजरा केला नाही. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी मोनिका राजळे यांना मानस कन्या मानले होते. त्या नात्याने बहीण पंकजा यांचा पराभव झाल्याने राजळे नाराज होत्या. मागील वेळेप्रमाणे विजयी सभा घेणे टाळले. मात्र शेवगाव व पाथर्डीतील कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंद साजरा केला. 

टॅग्स :Monika Rajaleआ. मोनिका राजळेshevgaon-acशेवगाव