हे तर ‘भाजप बचाओ’ आंदोलन- बाळासाहेब थोरात यांचा भाजपवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 08:51 PM2020-05-20T20:51:59+5:302020-05-20T20:52:06+5:30

संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही. त्यामुळे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून या आंदोलनाचा फार्स केला जात आहे. संकटकाळात भाजपच्या या वागण्याला महाराष्ट्र द्रोहच म्हणावे लागेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकान्वये केली आहे. 

This is the 'Save BJP' movement - Balasaheb Thorat's attack on BJP | हे तर ‘भाजप बचाओ’ आंदोलन- बाळासाहेब थोरात यांचा भाजपवर हल्लाबोल

हे तर ‘भाजप बचाओ’ आंदोलन- बाळासाहेब थोरात यांचा भाजपवर हल्लाबोल

Next

संगमनेर (जि. अहमदनगर) : राज्यात भाजपच्या वतीने सुरू करण्यात आलेले ‘महाराष्ट्र बचाओ आंदोलन’ हे भाजप बचाओ आंदोलन आहे. कोरोनाच्या संकटात सरकार सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते झोकून काम करत आहेत. या संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही. त्यामुळे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून या आंदोलनाचा फार्स केला जात आहे. संकटकाळात भाजपच्या या वागण्याला महाराष्ट्र द्रोहच म्हणावे लागेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकान्वये केली आहे. 
संगमनेर येथील संपर्क कार्यालयातून दिलेल्या पत्रकात थोरात यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटात राजकारण करायचे नाही. सर्वांनी एकजुटीने या संकटाचा सामना करण्याची ही वेळ आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही हीच भूमिका मांडली होती. पण त्यांची कृती मात्र, या भूमिकेच्या विरोधात आहे. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करायची सोडून पीएम केअरला मदत केली आहे. खरंतर त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीशी भांडायला हवे होते. त्यांनी दिल्लीवरून महाराष्ट्रासाठी मदत पॅकेज मंजूर करून घेतले असते, तर आम्हाला त्याचे कौतुक वाटले असते. पण फडणवीस आणि त्यांच्या सहकाºयांना महाराष्ट्र सरकारबरोबर बोलायचे नाही. त्यांना रोज राजभवनावर जाऊन राज्यपालांसोबतच चर्चा करायची आहे. आम्ही त्यांचे ऐकायला तयार आहोत. आमचे चुकत असेल तर ते दुरुस्त करू. त्यांना महाराष्ट्रात गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची आहे. संकटातून मार्ग काढण्यापेक्षाही सरकार अडचणीत कसे येईल, यात त्यांना अधिक स्वारस्य आहे. खरं तर फडणवीसांची निष्ठा महाराष्ट्रासोबत नाही. ती दिल्लीतल्या भाजपा नेत्यांसोबत आहे. 
महाराष्ट्रातील जनतेला राज्य सरकार करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची जाणीव आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी प्राणपणाने लढत आहेत. अशावेळी भाजपकडून सुरू असलेले गलिच्छ राजकारण जनता कधीही मान्य करणार नाही. उलट ती या चुकीच्या राजकारणाचा निषेध करेल, आणि भाजपला धडा शिकवेल, असे थोरात यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: This is the 'Save BJP' movement - Balasaheb Thorat's attack on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.