संस्कृत व संगीत तज्ञ डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांचे निधन

By सुदाम देशमुख | Published: December 14, 2023 12:42 PM2023-12-14T12:42:47+5:302023-12-14T12:43:40+5:30

डॉक्टर खरवंडीकर यांचा जन्म एक ऑक्टोबर 1935 रोजी झाला.  ते संस्कृत साहित्यिक होते.

Sanskrit and music expert Dr. Death of Devi Prasad Kharvandikar | संस्कृत व संगीत तज्ञ डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांचे निधन

संस्कृत व संगीत तज्ञ डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांचे निधन

अहमदनगर:  येथील ज्येष्ठ संगीत तज्ञ व संस्कृत तज्ञ डॉक्टर देवीप्रसाद खंडेराव खरवंडीकर (८८) यांचे गुरुवारी अहमदनगर येथे निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉक्टर खरवंडीकर यांचा जन्म एक ऑक्टोबर 1935 रोजी झाला.  ते संस्कृत साहित्यिक होते. ग. दि. माडगूळकरांचे गीत रामायण आणि भा.रा. तांबे यांच्या कवितांचा त्यांनी संस्कृत अनुवाद केला. खरवंडीकर हे शास्त्री गायक होते. संस्कृत भाषेचा गेल्या पन्नास वर्षापासूनचा त्यांचा व्यासंग राहिला आहे.‌अनेक शोधनिबंधाचे  त्यांनी लिखाण केले.  पंचवीस ग्रंथांचे संपादन, 20 स्वतंत्र संस्कृत ग्रंथांचे लेखन, दोनशेहून अधिक संस्कृत कविता आणि दीडशेवून अधिक संपादकीय लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. 50 हून अधिक पीएचडीच्या प्रबंधाचे परीक्षक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. महाराष्ट्र सरकारकडून त्यांना संस्कृत पंडित ही पदवी देखील मिळाली होती. भारताच्या राष्ट्रपती करून बाद नारायण व्यास पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्यांच्या निधनाबद्दल जिल्ह्यातील साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ञांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Web Title: Sanskrit and music expert Dr. Death of Devi Prasad Kharvandikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.