शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...
9
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
10
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
11
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
12
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
13
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
14
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
15
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
16
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
17
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
18
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
19
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
20
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!

नगरमधून आणखी १६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 4:08 PM

अहमदनगरमध्ये कोरोनाचा एक रूग्ण आढळल्याने त्या दृष्टीने प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आता या रूग्णाच्या संपर्कातील ८ व अन्य ८ अशा एकूण १६ जणांच्या थुंकीचे व रक्ताचे नमुने प्रशासनाने पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवले आहेत. 

अहमदनगर : अहमदनगरमध्येकोरोनाचा एक रूग्ण आढळल्याने त्या दृष्टीने प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आता या रूग्णाच्या संपर्कातील ८ व अन्य ८ अशा एकूण १६ जणांच्या थुंकीचे व रक्ताचे नमुने प्रशासनाने पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवले आहेत. नगरमध्ये दुबईहून आलेल्या चौघांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील एकाचा नमुना पॉझिटिव्ह आला. तर उर्वरित तिघांचे नमुने निगेटिव्ह आले. शुक्रवारी या कोरोनाबाधीत रूग्णाची माहिती प्रशासनाने जाहीर केली. त्यानंतर शनिवारी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. दूबईहून आलेल्या कोरोनाबाधीत रूग्णाच्या थेट संपर्कात चार जण, तर दूरच्या संपर्कात चार जण आले होते. याशिवाय इटलीहून आलेला एकजण व त्याच्या संपर्कातील तिघे आणि जिल्हा रूग्णालयात स्वत:हून तपासणीसाठी आलेले चौघे अशा एकूण १६ जणांचे नमुने पुण्याला एनआयव्हीकडे पाठवले असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली. रूग्णाला बूथ हॉस्पिटलमध्ये हलवले दरम्यान, कोरोनाबाधीत रूग्णाला जिल्हा रूग्णालयातून बूथ हॉस्पिटलमधील विलगीकरण केंद्रात हलवले आहे. १६ पैकी ४जण थेट रूग्णाच्या थेट संपर्कात होते. त्यांचे नमुने घेऊन त्यांना जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण केंद्रात ठेवले आहे. तर उर्वरित १२ जणांना त्यांच्या घरी निगरानीखाली ठेवले आहे. ..तर रूग्णाला डिस्चार्जकोरोनाबाधीत रूग्णाला सर्दी, खोकल्यासारखी कोणतीही लक्षणे नाहीत. तो ठणठणीत आहे. परंतु अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तो आरोग्या विभागाच्या देखरेखीखाली आहे. आणखी सात दिवसांनी पुन्हा या रूग्णाचे थुंकीचे व रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येतील. त्यात अहवाल निगेटीव्ह आला तर रूग्णाला डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती आरोग्य अधिका-यांनी दिली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोनाHealthआरोग्य