करडई पीक हद्दपार होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:39 AM2021-03-04T04:39:53+5:302021-03-04T04:39:53+5:30

पिंपळगाव माळवी : तेल बियात करडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिरायती भागातील करडी हे अंर्तगत पीक म्हणूनच महाराष्ट्रात परिचित आहे. ...

Safflower crop on the verge of extinction | करडई पीक हद्दपार होण्याच्या मार्गावर

करडई पीक हद्दपार होण्याच्या मार्गावर

Next

पिंपळगाव माळवी : तेल बियात करडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिरायती भागातील करडी हे अंर्तगत पीक म्हणूनच महाराष्ट्रात परिचित आहे.

नगर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणूनच परिचित असून, पिंपळगाव माळवी परिसर ज्वारी पिकासाठी पूर्वी प्रसिद्ध होता. या ज्वारी पिकांमध्ये आंतरपीक म्हणून करडईची मोठ्या प्रमाणात पूर्वी लागवड होत होती; परंतु अलीकडच्या काळात बहुतांश शेतकरी बागायती पिके घेऊ लागल्यामुळे करडई पीक दुर्मीळ होत चालले आहे.

हल्ली बाजारात मोठ्या प्रमाणावर आयात तेल वापरले जात असल्यामुळे करडी तेलाची मागणी घटत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या करडी पीक परवडेनासे झाले. बदलते हवामान, अनियमित पडणारा पाऊस, मजुरांची वानवा, थंडीचे वातावरण यामुळे जिरायती भागातील शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविल्याचे चित्र पिंपळगाव माळवी परिसरात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून करडई पीक हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.

----

आमची शेती जंगलाजवळ असल्यामुळे इतर पिकांची जंगलातील रानडुकरे नासाडी करतात. यावर्षी केवळ एक एकरच करडईचे पीक घेतले. या पिकाला डुकरांपासून उपद्रव होत नाही.

-अशोक लहारे,

शेतकरी, पिंपळगाव माळवी

----

०३ पिंपळगाव माळवी

पिंपळगाव माळवी येथील अशोक लहारे यांच्या शेतातील करडईची सुरू असलेली सोंगणी.

Web Title: Safflower crop on the verge of extinction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.