शस्त्राचा धाक दाखवून ट्रक चालकास लुटले; नगर-मनमाड महामार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 01:18 PM2020-05-17T13:18:14+5:302020-05-17T13:18:44+5:30

मध्यप्रदेश येथून कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये गहू घेऊन येणा-या ट्रक चालकास अज्ञात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी ट्रक चालकाकडील ५६ हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. 

Robbed the truck driver at gunpoint; Incident on Nagar-Manmad Highway | शस्त्राचा धाक दाखवून ट्रक चालकास लुटले; नगर-मनमाड महामार्गावरील घटना

शस्त्राचा धाक दाखवून ट्रक चालकास लुटले; नगर-मनमाड महामार्गावरील घटना

Next

कोपरगाव : मध्यप्रदेश येथून कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये गहू घेऊन येणा-या ट्रक चालकास अज्ञात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी ट्रक चालकाकडील ५६ हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. 
 या प्रकरणी ट्रक चालक लालजी रामपालसिंघ तोमर (वय ५०,रा.बाटर बक्स, ता. जि. भिंड, मध्यप्रदेश) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.  शनिवारी (दि.१६) रोजी रात्री १ वाजता पचोर, जि. राजगड (मध्यप्रदेश) येथून ट्रक (क्र.एम.एच १५ ई.जी.४७१७) कोपरगाव येथील औद्योगिक वसाहतीत गहू घेऊन येत आलो. रविवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास मला औद्योगिक वसाहतीचा रस्ता माहित नसल्याने तो विचारण्यासाठी नगर-मनमाड महामार्गावरील कातकाडे पेट्रोल पंपाजवळ थांबलो. यावेळी माझ्या समवेत ट्रकमध्ये बिपेनकुमार रामबरन बघेल व राहलसिंग विरणसिंग भदोरिया असे तिघे होते. तितक्यात अचानक ट्रकच्या दोन्ही बाजूच्या दरवाज्यातून चौघे आत शिरले. त्यांनी आम्हाला मारहाण, शिवीगाळ केली. यावेळी त्यांनी लोखंडी धारदार कत्तीचा धाक दाखवून माझ्याकडील द्राक्षाच्या भाड्याची ५६ हजाराची रोकड लुटून नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे करीत आहेत. 

Web Title: Robbed the truck driver at gunpoint; Incident on Nagar-Manmad Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.