शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

कर्जत-जामखेडची जबाबदारी माझ्यावर : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 2:58 PM

कर्जत-जामखेड मतदारसंघाची विकासकामांची जबाबदारी माझ्यावर सोपवा.

राशीन : कर्जत-जामखेड मतदारसंघाची विकासकामांची जबाबदारी माझ्यावर सोपवा. बारामतीसारखा विकासाचा अनुशेष भरून दाखवतो, असे म्हणत या मतदारसंघाला दिलेला उमेदवार योग्यच असेल,अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी येथे दिली.चिलवडी (ता.कर्जत) येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी राजेभोसले अध्यक्षस्थानी होते. पवार म्हणाले, राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना सत्ताधारी सरकार दुष्काळ सदृश स्थिती असल्याचे सांगते. त्यांना शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे देणे-घेणे नाही. शेतकºयांसाठी कर्जमाफीची फसवी घोषणा केली. धनगर समाजाला आम्हीच देऊ केलेल्या आरक्षणाचे या सरकारने भिजत घोंगडे ठेवले, असे म्हणत पवारांनी भाजप-शिवसेनेवर निशाणा साधला.धनदांडग्यांचे हे सरकार आहे. देशाचा चौकीदार म्हणविणारे मोदी कोट्यवधी रूपयांचा चुना लावणारे विजय मल्ल्या, निरव मोदी यांना अभय देणारे आहे. गोरगरिबांसाठी लबाडाघरचे आवतन असणारे फसवे सरकार असल्याने जनतेने यावेळेला युती सरकारला घरी बसवावे. येत्या विधानसभेला युतीचे सरकार पाडण्यासाठी सर्वांनी आता जोखीम उचलण्याची वेळ आली आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, माजी पंचायत समिती सदस्य संग्राम पाटील, बाळासाहेब साळुंके, अ‍ॅड. कैलास शेवाळे, शाहू राजेभोसले, शहाजी राजेभोसले आदी उपस्थित होते.आमच्यात मेळ नाही म्हणून दुसरा आमदारपालकमंत्री राम शिंदे मतदारसंघात उद्घाटन करण्यात व्यस्त आहेत. मतदारसंघात रस्त्याची दुरवस्था आहे. कर्जतच्या एसटी आगाराची फसवी घोषणा करीत ते जनतेला फसवित आहेत. दादा, व्यासपीठावरील आमच्या लोकांमध्ये मेळ नसल्याने दुसरा आमदार होत आहे. त्यामुळे आपण स्वत: या भागाचे प्रतिनिधीत्व करावे, अशी कर्जतकरांची अपेक्षा असल्याचे पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड म्हणाले.निवडणुका आल्या की राम मंदिर आठवतेच्जनतेच्या भावनांना हात घालणारे हे सरकार आहे. निवडणुका जवळ आल्या की, प्रभू रामचंद्रांचे मंदिर बांधण्याची त्यांना आठवण होते. मुंबईत महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असताना उध्दव ठाकरेंना वडिलांचे स्मारक उभारता आले नाही, त्यांनी राम मंदिर बांधण्याची वल्गना करू नये, असा टोलाही अजित पवारांनी मारला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत