भंडारदरा ओव्हर फ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:19 AM2021-09-13T04:19:58+5:302021-09-13T04:19:58+5:30

धरणात होत असलेल्या नवीन पाण्याची आवक लक्षात घेत धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात येईल, असे अकोले भंडारदरा ...

Reservoir overflow | भंडारदरा ओव्हर फ्लो

भंडारदरा ओव्हर फ्लो

Next

धरणात होत असलेल्या नवीन पाण्याची आवक लक्षात घेत धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात येईल, असे अकोले भंडारदरा जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितले.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी मान्सूनचे वेळेत आगमन झाले होते. यावेळी धरणात पाणीसाठाही शिल्लक होता, त्यामुळे यावर्षी धरण लवकरच भरणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, मध्यंतरी पावसाने ओढ दिली आणि १५ ऑगस्टपूर्वी भंडारदरा धरण भरण्याच्या आशा फोल ठरल्या. मात्र, मागील चार दिवसांपासून परिसरात पावसाने चांगला जोर धरला आणि धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या. अखेर रविवारी सकाळी अकरा वाजता भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले. धरणातील पाणीसाठा ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट झाला आणि पाटबंधारे विभागाने धरण भरल्याचे जाहीर करीत धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केली.

रविवारी सकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा १० हजार ९०९ दशलक्ष घनफूट झाला होता. धरण ओव्हर फ्लो होण्यासाठी केवळ १३० दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक होणे बाकी होते. शनिवारी रात्रभर भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला असल्याने सकाळी पाच तासांत धरणात १३० दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आणि धरणाच्या सांडव्यावरून जलाशयातील पाण्याच्या लाटा बाहेर झेपाऊ लागताच जलसंपदा विभागाने धरण ओव्हर फ्लो झाल्याचे जाहीर केले.

कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता जोरवकर, शाखा अधिकारी अभिजित देशमुख, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक तेजेश शिंदे, बिनतारी यंत्र चालक प्रकाश चव्हाण, जनरेटर ऑपरेटर शपाबळकर, मुकादम वसंत भालेराव, वायरमन अर्जुन धनगर, सुरेश हंबीर, गोविंद बरतड, पांडुरंग झडे, गणपत गोरे, म॔गळीराम मधे, दामोधर धादवड, बाळू भांगरे, च॔दर उघडे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

...................

१९६७ पासून भंडारदरा धरण सप्टेंबर महिन्यात १७ वेळा भरले, तर २३ वेळा धरण ऑगस्ट महिन्यात भरले होते.

.............

आता प्रतीक्षा निळवंडेची

भंडारदरा धरण भरल्यानंतर या धरणातून सोडण्यात येणारे पाणी निळवंडे धरणात येत असते. रविवारी सकाळी सहा वाजता निळवंडे धरणातील पाणी साठा ८३ टक्क्यांहून अधिक होता. सकाळी अकरा वाजता भंडारदरा धरणातून सुमारे सव्वातीन हजार कुसेकने पाणी सोडण्यात येत असल्याने निळवंडे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होणार असल्याने निळवंडे केव्हा भरते याकडे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Reservoir overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.