शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

रेखा जरे हत्याकांड : आरोपी बाळ बाेठेला ६ दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 2:07 PM

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ जगन्नाथ बोठे याला पारनेर न्यायालयाने ६  दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ जगन्नाथ बोठे याला पारनेर न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. २० मार्चपऱ्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अडीच महिन्यांनी नगर पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून अटक केली. हत्येच्या घटनेवेळी बाळ बोठे हा सकाळ वृत्तपत्राचा नगरचा कार्यकारी संपादक होता. 

पोलिसांना बोठे यास पारनेर न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली. गेल्या तीन महिन्यांपासून बोठे का फरार होता. त्याला तीन महिन्यात कोणी मदत केली. तसेच रेखा जरे यांची हत्या त्याने का केली, याचा उलगडा अजून व्हायचा आहे. त्यासाठी पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकील सिध्दार्थ बागले यांनी केली.  

बोठेसह त्याला मदत करणारे आंध्र प्रदेशातील जनार्दन चंद्राप्पा, राजशेखर चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ व महेश वसंतराव तनपुरे (रा. नवलेनगर, सावेडी, अहमदनगर) यांनाही अटक केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा. हैदराबाद) ही महिला आरोपी फरार आहे.

रेखा जरे यांची ३० नोव्हेंबरला नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट (ता. पारनेर) परिसरात गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. जरे यांच्या हत्येची सुपारी देणारा बोठे मात्र फरार झाला होता. बोठे हा हैदराबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहा पोलीस पथकांनी पाच दिवस हैदराबाद येथील बिलालनगर परिसरात शोध घेऊन बोठे याच्यासह त्याला मदत करणाऱ्या आरोपींना जेरबंद केले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरahmednagar district courtअहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालय