राठोड- आगरकर युती : खासदार गांधी यांच्यावर कडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 04:05 PM2018-05-04T16:05:35+5:302018-05-04T16:13:13+5:30

मागील विधानसभा निवडणुकीत परस्परांविरुद्ध लढणारे माजी आमदार अनिल राठोड व माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर महापालिकेत एकत्र आले आहेत. दोघांच्या मदतीने भाजपच्या आगरकर गटाचे बाबासाहेब वाकळे स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून आले.

Rathod-Agarkar Alliance: Link to MP Gandhi | राठोड- आगरकर युती : खासदार गांधी यांच्यावर कडी

राठोड- आगरकर युती : खासदार गांधी यांच्यावर कडी

Next
ठळक मुद्देशहर भाजपचा बहिष्कारसेनेचा एक गट नाराजशिवसेना, भाजप व सर्व सदस्यांमुळे दुस-यांदा सभापती झालो - बाबासाहेब वाकळे, नवे सभापतीमहापालिकेत कोणतेही पद घ्यायचे नाही हा निर्णय धादांत खोटा - अॅड. अभय अागरकर, माजी नगराध्यक्ष

अहमदनगर : मागील विधानसभा निवडणुकीत परस्परांविरुद्ध लढणारे माजी आमदार अनिल राठोड व माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर महापालिकेत एकत्र आले आहेत. दोघांच्या मदतीने भाजपच्या आगरकर गटाचे बाबासाहेब वाकळे स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून आले.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शुक्रवारी सकाळी महापालिकेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी एकमेव अर्ज असल्याने पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी वाकळे यांची निवड घोषित केली. या विशेष सभेला स्थायी समितीच्या १६ पैकी १२ सदस्य गैरहजर होते. राष्ट्रवादीचे बंडखोर बाळासाहेब बोराटे, ख्वाजाबी कुरेशी, समद खान, कॉंग्रेसचे बंडखोर मुदस्सर शेख गैरहजर राहिले. वाकळे यांची निवड होताच महापालिकेत गुलालाची उधळण झाली. ढोल- ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला. सावेडीतील वाकळे यांचे कार्यकर्ते, भाजप युवा मोचार्चे अध्यक्ष नितीन शेलार, उमेश साठे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार केला.
स्थायी समितीमध्ये भाजपच्या आगरकर गटाचे वाकळे यांच्यासह उषाताई नलावडे व दत्ता कावरे असे तीन सदस्य आहेत. तर शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. वाकळे यांना सभापती करण्याचा राठोड- आगरकर यांनी संयुक्तपणे निर्णय घेतला. त्यानंतर वाकळे यांनी स्थायीच्या सर्वच्या सर्व सोळा सदस्यांना समाधानी केल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. बंडखोर गटाचे चार सदस्य गैरहजर असले तरी त्यांचा वाकळे यांनाच अप्रत्यक्ष पाठिंबा राहिला. त्यांची नाराजी अमृत योजनेच्या आर्थिक व्यवहारातून असल्याची महापालिकेत चर्चा होती.

आगरकर- राठोड एकत्र
गेल्या विधानसभा निवडणुकीत परस्परविरोधात लढणारे अनिल राठोड व अभय आगरकर एकत्र आले होते. दोघांच्या उपस्थितीत वाकळे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी महापौर सुरेखा कदम, सेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, गटनेते संजय शेंडगे, संभाजी कदम उपस्थित होते.
शहर भाजपचा बहिष्कार
महापालिकेत भाजपचा सभापती होत असताना हा आनंद साजरा करण्यासाठी शहर भाजपचा एकही पदाधिकारी फिरकला नाही. त्यामुळे भाजपचा नव्या सभापतीवर बहिष्कार असल्याचे स्पष्ट झाले. जल्लोष साजरा करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात भाजपचे पंचे होते.
सेनेचा एक गट नाराज
वाकळे यांच्या आनंदापासून शिवसेनेचा एक गट वंचित असल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड स्वत: महापालिकेत असताना उपमहापौर अनिल बोरुडे, सभागृह नेते गणेश कवडे, माजी सभागृह नेते अनिल शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह सेनेचा गट अलिप्त राहिला. हा गट महापौरांवर नाराज असल्याची माहिती आहे.

शिवसेना, भाजप व सर्व सदस्यांमुळे दुस-यांदा सभापती झालो. जास्तीत जास्त चांगली कामे करून भाजपचे नाव उंचाविण्यासाठी प्रयत्न करू. पक्षादेश होता म्हणून उपमहापौर पदाच्यावेळी अर्ज काढून घेतला. सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय त्या पदापुरता होता. पक्षाने कारवाई केली तर सामोरे जावू.  वरिष्ठ पातळीवर शिवसेना- भाजपचे काय संबंध अाहेत त्याचा विचार न करता स्थानिक पातळीवर चांगले काम करू. सावेडीत मनपाचे हाॅस्पिटल उभारणार अाहे. पाणी योजनेच्या रखडलेल्या कामाला, नाट्यगृहाच्या कामाला गती देवू. गैरहजर सदस्य नाराज नव्हते. त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे ते गैरहजर होते. 
- बाबासाहेब वाकळे, नवे सभापती
 

महापालिकेत कोणतेही पद घ्यायचे नाही हा निर्णय धादांत खोटा अाहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी एखादी बैठक तरी झाली का ? पद घ्यायचे नाही, असा कोणताही निर्णय झालाच नाही. स्थानिक पातळीवरील निर्णय परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. काल युती नव्हती, उद्याबाबत अाज सांगू शकत नाही. पक्षातील वरच्या स्तरावर काही वाद सुरू असले म्हणजे स्थानिक पातळीवर तसेच केले पाहिजे, हा समज चुकीचा अाहे.सेना- भाजप  विधानपरिषद निवडणुकीत एकत्र अाहेत. प्रत्येकवेळी युतीबाबत मागे- पुढे होत राहते. अाजच्या घडीला अामची युती असून काहीही बिघडलेले नाही. उपमहापौर करायला युती चालली अाणि अाताच खासदार गांधी यांना युतीचे वावडे कसे ? महापालिकेत पद घ्यायचे नाही हा त्यांचा एकतर्फी निर्णय अाहे. त्यांनी प्रदेशला काही कळवले तर त्याबाबत प्रदेशशी चर्चा करू. पण कारवाई करण्याच्या गांधी यांच्या केवळ वल्गना अाहेत. विनाकारण पार्टीत चुकीचे चाललेय, असे दाखविणे अयोग्य अाहे. 

  - अॅड. अभय अागरकर, माजी नगराध्यक्ष

Web Title: Rathod-Agarkar Alliance: Link to MP Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.