शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

राहुरी तालुका वार्तापत्र : हुमणीचा कारखान्यांच्या ‘टार्गेट क्रशींग’ला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:12 AM

मुळा-प्रवरा नद्यांच्या कुशीत असलेल्या राहुरी तालुक्यात यंदा मुबलक ऊस उभा असताना साखर कारखान्यांना हुमणीने जबर धक्का दिला आहे.

भाऊसाहेब येवलेमुळा-प्रवरा नद्यांच्या कुशीत असलेल्या राहुरी तालुक्यात यंदा मुबलक ऊस उभा असताना साखर कारखान्यांना हुमणीने जबर धक्का दिला आहे. त्यापेक्षाही जास्त जबर धक्का शेतकऱ्यांना बसला आहे. सहकारी सोसायट्या व बाजारपेठेला सावरणे अवघड बनले आहे़ राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे व वांबोरी येथील प्रसाद शुगर यांनी यंदा विस्तारीकरण करून उसाचे मोठ्या प्रमाणावर गळीत करण्याचे टार्गेट टोळ्यांसमोर ठेवले होते. मात्र ५० टक्के टार्गेट पूर्ण करणे देखील कारखान्यांना अवघड होणार आहे. बाहेरील कारखाने राहुरीचा ऊस नेण्यासाठी सज्ज असल्याने स्थानिक कारखाने कात्रीत सापडले आहेत.वांबोरी येथील प्रसाद शुगरने दैनंदिन गाळप क्षमता २ हजार ५०० टनावरून ४ हजार टन केली होती. यंदाच्या गळीत हंगामात आठ लाख टन उसाचे गाळप करण्याची घोषणा केली होती. कारखान्याकडे नऊ लाख टन उसाची नोंद झाल्याचा दावाही करण्यात आला होता. याशिवाय बाहेरूनही ऊस आणण्याची तयारी केली होती. यंत्र सामग्रीचे आधुनिकीकरणाबरोबरच पुरेशा प्रमाणावर ऊस तोडणी कामगारांची जमवाजमवही केली होती. मात्र हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने टार्गेट पूर्ण करण्याला बे्रक बसणार आहे.डॉ. बा. बा. तनपुरे कारखान्याचे बॉयलर बदलून ओव्हर आॅइलिंग व्यवस्थित केल्याने सहा लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सर्वसामान्य शेतकरी राहुरीलाच ऊस देतो, असा इतिहास आहे. मात्र यंदा एकर-दोन एकरवाला ऊस उत्पादक अडचणीत आला आहे. त्यामुळे राहुरी कारखान्यापुढे ऊसाचे शॉर्टेज हेच मोठे आव्हान आहे. यंदा पाच लाख टन ऊस गाळप करण्याचा कारखान्याचा मानस आहे.उसाचे उत्पादन घटल्याने तनपुरे कारखानाही टार्गेट पूर्ण करण्यास असमर्थ ठरणार आहे. यंदा कपाशीचे उत्पादन घटल्याने बाजारपेठेवर दुष्काळाचे सावट आहे.  हुमणीमुळे सहकारी सोसायट्यांचे कंबरडे मोडणार आहे. मुळा धरणाचे पाणी आटल्याने शेतीला बे्रक बसला आहे. व्यापारावर मंदीचे सावट असल्याने सर्व क्षेत्रात सन्नाटा आहे.प्रसाद व राहुरी कारखान्याला मिळून १४ लाख टन उसाची भूक आहे. प्रत्यक्षात ९ लाख टन उपलब्ध आहे. याशिवाय बाहेरील आठ कारखाने राहुरीचा ऊस वाहून नेत आहेत. अशा परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाल्याने मौन व्रत धारण करून आहेत. दुस-या बाजूला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करण्याच्या मनस्थितीत नाहीत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी