निळवंडेच्या बंदिस्त कालव्यांचा प्रश्न मिटला, मुख्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 05:29 PM2019-06-11T17:29:25+5:302019-06-11T17:29:51+5:30

निळवंडे कालव्याच्या कामासाठी भू-संपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता बंदिस्त पाईपलाईनमधून पाणी देता येणार नाही.

The question of the closed canals of the Nilvande, the Chief Minister's information | निळवंडेच्या बंदिस्त कालव्यांचा प्रश्न मिटला, मुख्यमंत्र्यांची माहिती

निळवंडेच्या बंदिस्त कालव्यांचा प्रश्न मिटला, मुख्यमंत्र्यांची माहिती

googlenewsNext

अहमदनगर  - निळवंडे कालव्याच्या कामासाठी भू-संपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता बंदिस्त पाईपलाईनमधून पाणी देता येणार नाही. त्यामुळे उद्यापासून पोलीस बंदोबस्ताशिवाय कालव्याचे काम सुरू होईल, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

अकोले तालुक्यातील निळवंडे धरण्याचे कालव्यांबाबत वाद निर्माण झाला होता. कालव्यांचे कामही प्रकल्प्रग्रस्त व कालवेग्रस्तांनी बंद पाडले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजीमंत्री राधाकृष्ण विखे, मुधकरराव पिचड, आ. वैभव पिचड आदी उपस्थित होते.

Web Title: The question of the closed canals of the Nilvande, the Chief Minister's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.