हाथरस, बलरामपूर येथील घटनेचा निषेध; आरपीआयच्या वतीने नगरला रास्ता रोको; कार्यकर्त्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 03:35 PM2020-10-02T15:35:38+5:302020-10-02T15:35:38+5:30

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूरमध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा शुक्रवारी निषेध केला. शहरातील निलक्रांती चौक येथे रास्ता रोको करण्यात आले. 

Protest at Hathras, Balrampur; Block the road to the town on behalf of the RPI; Activists arrested | हाथरस, बलरामपूर येथील घटनेचा निषेध; आरपीआयच्या वतीने नगरला रास्ता रोको; कार्यकर्त्यांना अटक

हाथरस, बलरामपूर येथील घटनेचा निषेध; आरपीआयच्या वतीने नगरला रास्ता रोको; कार्यकर्त्यांना अटक

googlenewsNext

अहमदनगर : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूरमध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा शुक्रवारी निषेध केला. शहरातील निलक्रांती चौक येथे रास्ता रोको करण्यात आले. 

यावेळी तोफखाना पोलिसांना आंदोलकांना अटक केली. या आंदोलनात माजी नगरसेवक अजय साळवे, आरपीआयचे युवक शहर अध्यक्ष अमित काळे, विजय भांबळ, किरण दाभाडे, अशोक केदारे, दिपक गायकवाड, विनोद भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे, सनी खरारे, मंगेश मोकळ, संतोष सारसर, गौतम कांबळे, दया गजभिये, अविनाश भोसले आदींसह आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

     काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. संपूर्ण देशात आंध्र प्रदेश आणि तेलंगानाच्या धर्तीवर दिशा कायदा लागू करावा, बलात्कार प्रकरणातील आरोपींची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन एक वर्षात निकाल लावावा, सदर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, आदी विविध मागण्या केल्या. 
 

Web Title: Protest at Hathras, Balrampur; Block the road to the town on behalf of the RPI; Activists arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.